Satpur Gambling Raid Nashikवज्रांनगर येथे जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-2 ची मोठी कारवाई; 49 जण ताब्यात.

Satpur Gambling Raid Nashik

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून, सातपूर परिसरातील वज्रांनगर येथे सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने मोठी कारवाई केली. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यावर अचानक छापा टाकत पोलिसांनी 49 जणांना ताब्यात घेतले.

या कारवाईत 50 लाख 85 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये 19 मोटारसायकली, चारचाकी वाहने, 49 मोबाईल फोन तसेच मोठ्या प्रमाणात रोकड यांचा समावेश आहे.

जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने चार पथके तयार केली. MIDC अंबड पोलिसांच्या मदतीने शेडच्या दोन्ही प्रवेशद्वारांवरून एकाचवेळी कारवाई करण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र बाहेर तैनात असलेल्या पथकाने त्यांना पकडले. _ Satpur Gambling Raid Nashik

कारवाईदरम्यान जुगार खेळण्यासाठी वापरली जाणारी जागा, रोकड, मोबाईल आणि वाहनांसह मोठ्या प्रमाणावर साहित्य पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केला जात आहे.

दरम्यान, या कारवाईत काही स्थानिक राजकीय व्यक्तींशी संबंधित व्यक्तींची उपस्थिती असल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाची चर्चा आणखी वाढली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगाराचा अड्डा सुरू असताना स्थानिक पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आधी का आला नाही, याबाबतही परिसरात प्रश्न उपस्थित होत आहेत.

मात्र, स्थानिक पोलिसांना या अड्ड्याची माहिती होती का किंवा याकडे दुर्लक्ष करण्यात आले का, याबाबतची वस्तुस्थिती तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

_Satpur Gambling Raid Nashik

Radisson Hotel Sewage Pollution : रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; घोडांबे धरणालाही प्रदूषणाचा धोका

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *