Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested
नाशिक : नाशिक शहरातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने सराईत घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींच्या चौकशीत गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण आठ घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी ६ लाख ३१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक शहरातील घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांनी गुन्हेशाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट क्रमांक १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई _ Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested
४ सप्टेंबर २०२६ रोजी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत मरकड व प्रदीप म्हसदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी लकी विल्सन भंडारे व त्याचे साथीदार चोरीचा माल विक्री करण्यासाठी व्ही.एन. नाईक कॉलेजजवळील डोंगरी वसतिगृह मैदान परिसरात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
- लकी विल्सन भंडारे (वय २०), रा. शमोवेल बंगला, ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, नाशिक.
- उमेश कैलास ठोके (वय २३), रा. शमोवेल बंगला, ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, नाशिक.
- अजय गोपिचंद बच्छिरे (वय २०), रा. शमोवेल बंगला, ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, नाशिक.
सोन्यासह रोकड व साहित्य जप्त _ Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested
पोलिसांनी आरोपींकडून ४५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगडी, ५८ हजार रुपये रोख, एक कॅमेरा, दोन पुरातन नाणी तसेच सोन्याची लगड तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ३१ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एकूण आठ घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आठ गुन्हे उघडकीस
या कारवाईमुळे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील खालील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत : _ Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७९/२०२६
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५९/२०२६
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६०/२०२६
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६३/२०२६
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७४/२०२६
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७६/२०२६
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१०/२०२६
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४४/२०२६
या सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई _ Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested
ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हेशाखा युनिट क्रमांक १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, सहायक पोलीस उपनिरीक्षक योगीराज गायकवाड, तसेच पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे, प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, रमेश कोळी, नाझिमखान पठाण, रविंद्र आढाव, देविदास ठाकरे, उत्तम पवार, रोहिदास लिलके, मुश्रीफ शेख, पोलीस अंमलदार राम बर्डे, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, गणेश रुमाले, जगेश्वर बोरेसे, सुनील भोसले, श्रीकांत सूर्यवंशी, समाधान शिंदे, चापोअं. समाधान पवार, सुकुमार पवार, मपोहवा शर्मिला कोकणी आणि मपोअं मनिषा सरोदे यांनी सहभाग घेतला.
गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या या कारवाईमुळे घरफोडीच्या आठ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला असून, मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
_Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested

