Nashik MHADA Land Fraud Case Arrestम्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत व निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक; सरकारवाडा पोलिसांचा तपास अधिक तीव्र.

Nashik MHADA Land Fraud Case Arrest

नाशिक | ३० जुलै २०२६

नाशिकातील गाजत असलेल्या म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आणखी दोन महसूल अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तहसील कार्यालयातील कार्यरत मंडळ अधिकारी दिलीप कचरू वामन तसेच सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्याम एकनाथ बोरसे यांचा समावेश आहे. न्यायालयाने दोघांनाही ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मार्च महिन्यात सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या या गुन्ह्यात बनावट भूमी अभिलेख नकाशे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासन व म्हाडाची फसवणूक करून तब्बल ४५ लेआउटची विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात यापूर्वीच १९८ विकासक आणि व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासानंतर दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयितांनी विकासक, जमीनमालक आणि गुंतवणूकदारांशी संगनमत करून भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट मोजणी नकाशे, हिस्सा फॉर्म क्रमांक ४ व १२, गटबुक तसेच अन्य कागदपत्रांची आवश्यक शहानिशा न करता फेरफार नोंदी मंजूर केल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयाचा आदेश नसतानाही १४ सर्व्हे/गटांतील फेरफार नोंदी बेकायदेशीररीत्या प्रमाणित करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांची गेल्या आठवडाभरापासून चौकशी सुरू होती. तपासादरम्यान गुन्ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्यांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Nashik MHADA Land Fraud Case Arrest)

(नाशिक प्रतिनिधी : दिपक सरोदे) Nashik MHADA Land Fraud Case Arrest

नाशिकच्या दिलीप गावितची राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण झेप; संघर्षातून घडला इतिहास

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik MHADA Land Fraud Case Arrest : नाशिक म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत व निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed