OneFDA Nashik Food Complaints 2026
नाशिक | २९ जुलै २०२६ : अन्न भेसळ, अस्वच्छता, मुदतबाह्य तसेच निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात नागरिकांकडून तक्रारी नोंदविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या ‘एकएफडीए’ (OneFDA) ऑनलाइन तक्रार पोर्टलला नाशिक विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ जुलै २०२६ रोजी सुरू झालेल्या या पोर्टलवर अवघ्या १५ दिवसांत १२४ ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, त्यापैकी बहुतांश तक्रारींवर तपासणी करून आवश्यक कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना घरबसल्या अन्नाशी संबंधित तक्रारी नोंदविता याव्यात तसेच संबंधित तक्रारीवरील कारवाईची माहिती ऑनलाइन पाहता यावी, यासाठी ‘एकएफडीए’ (OneFDA) हे ऑनलाइन तक्रार पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
नाशिक विभागात प्राप्त झालेल्या १२४ तक्रारींचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे : OneFDA Nashik Food Complaints 2026
निकृष्ट दर्जाचे पॅकेज्ड अन्न व लेबलिंगमधील त्रुटी – २८ तक्रारी
अस्वच्छ उत्पादन व साठवणूक – १६ तक्रारी
मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री – १३ तक्रारी
दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ – १३ तक्रारी
प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची विक्री – १२ तक्रारी
अन्नपदार्थांमध्ये बाह्य घटक आढळणे – १२ तक्रारी
हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याबाबत – १० तक्रारी
खाद्यतेल व तुपातील भेसळ – ३ तक्रारी
दिशाभूल करणारे लेबल – २ तक्रारी
इतर स्वरूपाच्या तक्रारी – १५ तक्रारी
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अन्नाशी संबंधित कोणतीही भेसळ, अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे किंवा मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्यास OneFDA पोर्टलच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून नागरिकांना तक्रारीची स्थिती आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहितीही ऑनलाइन उपलब्ध होत आहे.
(प्रतिनिधी : कुणाल दानेच) OneFDA Nashik Food Complaints 2026
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची ५९.५८ लाखांची सायबर फसवणूक


[…] OneFDA Nashik Food Complaints 2026 : नाशिक विभागात OneFDA पोर्टल… […]
I’ve tried a few sites recently but this one really stands out. The loading speed is great and the games are super smooth. Definitely check out idtopslot88 if you want a hassle-free experience.