Nashik Illegal Money Lending And Plot Dispute Case
नाशिक : अवैध सावकारीच्या व्यवहारातून मोठी रक्कम उकळल्यानंतरही अतिरिक्त पैशांची मागणी करत मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या मालकीच्या प्लॉटवर ताबा मिळवण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सद्दाम शेख आणि लता बर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अमृतधाम परिसरात राहणाऱ्या एका मेडिकल व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी २०२१ मध्ये सद्दाम शेख याच्याकडून २० लाख रुपये उसने घेतले होते. या रकमेच्या व्यवहारापोटी आतापर्यंत तब्बल ४८ लाख रुपये व्याज म्हणून दिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. मात्र, एवढी रक्कम दिल्यानंतरही व्यवहार पूर्ण झालेला नसल्याचे सांगत संशयितांकडून आणखी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून फिर्यादी यांना पंचवटी परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तेथे त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करण्यात आली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
चार तास कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप _ Nashik Illegal Money Lending And Plot Dispute Case
हॉटेलमधून फिर्यादीला जबरदस्तीने अमृतधाम परिसरातील गोल्डस्टार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे सुमारे चार तास डांबून ठेवण्यात आले. यावेळी फिर्यादी तसेच त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
धमकी आणि दबावाच्या परिस्थितीत फिर्यादी यांच्या मालकीच्या प्लॉटसंदर्भात डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट करून घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित प्लॉटवर संशयितांनी ताबा मिळवल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप _ Nashik Illegal Money Lending And Plot Dispute Case
या संपूर्ण व्यवहारात लता बर्डे हिने मध्यस्थी केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. प्लॉट सद्दाम शेखच्या नावावर करून न दिल्यास आपल्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पंचवटी पोलिसांनी सद्दाम शेख आणि लता बर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपहरण, मारहाण, धमकी तसेच मालमत्तेशी संबंधित व्यवहाराबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
याच संशयितांविरोधात आणखी एक गंभीर तक्रार _ Nashik Illegal Money Lending And Plot Dispute Case
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच आडगाव पोलिस ठाण्यात प्लॉटचा ताबा सोडण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून याच संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अवैध सावकारी, आर्थिक दबाव आणि मालमत्ता बळकावण्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे पोलिस तपासाच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले जात आहे.
या प्रकरणातील पुढील तपासात आर्थिक व्यवहार, प्लॉटशी संबंधित कागदपत्रे, डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची माहिती तपासली जाण्याची शक्यता आहे.
न्यूज महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Nashik Illegal Money Lending And Plot Dispute Case


[…] Nashik Illegal Money Lending And Plot Dispute Case : नाशिकमध्ये अवैध स… […]
Super easy to navigate and the customer support is actually helpful. Definitely a top-tier choice for gamers. Give pkbuji999 a try!
I’ve tried a few spots lately but this one really stands out. The interface is smooth and the payouts are fair. Definitely check out bdh444 if you want a reliable place to play.
The VIP treatment here is next level and I love how they reward loyal players without making it complicated. Every spin runs smoothly and the bonus structures are actually fair compared to other casinos I have tried. Customer service always goes the extra mile when I reach out. A solid choice for serious gamers. u888vip1
cobetplay has been my daily go to spot for months now and I can not stop recommending it. The welcome bonus was exactly as promised and the game library keeps growing with fresh titles. I love that the support chat is always active and replies in a friendly conversational style. It takes the stress out of online gaming and just feels like a fun weekend tradition. cobetplay
Been spending a lot of time here lately and the rewards are actually legit. It is a great place to unwind and have some fun. Love everything about inzioplay.
Clean design and very straightforward. No annoying pop-ups or complicated menus, just straight to the action. Love krscbet.
Best betting experience I have had recently. The interface is clean and the betting options are quite comprehensive. I feel very secure playing here. Check out vn989bet.
I really like the layout of this site and how intuitive it is for new players. I had a blast playing on br5542bet last weekend.