Anganwadi Nutrition Food Dead Bird Devgaon Nashik
नाशिक | प्रतिनिधी : कुणाल दानेच
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथे अंगणवाडीतील पोषण आहाराबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंगणवाडीतील लाभार्थी मुलांसाठी वितरित करण्यात आलेल्या बंद पोषण आहाराच्या पाकिटात कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळल्याचा दावा करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव बिट क्रमांक २ मधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून नियमितप्रमाणे लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. संबंधित कुटुंबाने घरी नेल्यानंतर पाकीट उघडले असता त्यामध्ये मृत पक्षी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पक्षी कुजलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने देण्यात आली.
या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, लहान मुलांच्या आरोग्याशी निष्काळजीपणा होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. शासनाकडून वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. तपासानंतर या घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांकडून करण्यात येत आहे.
Anganwadi Nutrition Food Dead Bird Devgaon Nashik
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेतकरीही दिल्लीकडे; FTA विरोधात राजधानीत तणाव


[…] अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकि… […]
[…] अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकि… […]