Spectrum Ethers Company Fire at Rasegaon Dindoriरासेगाव येथील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत भीषण आग; दोन कामगार जखमी, घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल.

Spectrum Ethers Company Fire at Rasegaon Dindori

प्रतिनिधी : धीरज भावसार | दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील स्पेक्ट्रम इथर्स (Spectrum Ethers) या रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपनीत मंगळवारी (२१ जुलै) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीनंतर कंपनीत गॅस गळती झाल्याची अफवा पसरल्याने कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी कंपनीबाहेर धाव घेतली.

प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत नियमित कामकाज सुरू असतानाच अचानक आग लागली. सुरुवातीला आग मर्यादित होती, मात्र काही वेळातच कंपनीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी गॅस गळती झाल्याची चर्चा पसरल्याने कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली.

या धावपळीत दोन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पथक आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, गॅस गळतीबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच पुढील तपशील स्पष्ट होणार आहे.

Spectrum Ethers Company Fire at Rasegaon Dindori

अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी; देवगावातील घटनेने खळबळ

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Spectrum Ethers Company Fire at Rasegaon Dindori : दिंडोरीतील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत भीषण आग; दोन कामगार जखमी, गॅस गळतीच्या अफवेने उडाली धावपळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *