Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident
चांदवड/राहुड घाट : मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुड घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने तब्बल पाच वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कंटेनरमधील हेल्परचा मृत्यू झाला असून ७ ते ८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, RJ 36 GA 8612 क्रमांकाचा टायरने भरलेला कंटेनर मुंबईकडून मालेगावच्या दिशेने जात होता. राहुड घाटातील उतारावर अचानक कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
यानंतर अनियंत्रित कंटेनरने पुढे जात असलेल्या MP 09 AJ 6877 क्रमांकाच्या लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या बसमध्ये सुमारे ३० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंटेनरमधील हेल्परने वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कंटेनरचा धडका देण्याचा थरार यानंतरही सुरूच राहिला. अनियंत्रित कंटेनरने इंदूरहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस व्हॅनलाही धडक दिली. या वाहनात ७ ते ८ जण असल्याची प्राथमिक माहिती असून, यातील काही जण जखमी झाल्याचे समजते.
यानंतर कंटेनरवरील टायर आणि इतर साहित्य रस्त्यावर विखुरले. पुढे मालेगावच्या दिशेने जात असताना कंटेनरने MH 41 BR 4225 क्रमांकाच्या क्रेटा कारलाही धडक दिली. कारमध्ये दोन जण असल्याची माहिती असून, त्यातील एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे._ Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident
या भीषण अपघातात एका पिकअप वाहनाचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच बाबाज रुग्णवाहिका तसेच रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज मोफत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि टोल कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना चांदवड आणि मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. _ Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident
अपघातामुळे मुंबई–आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
प्रशासनाच्या उपाययोजनांवर नागरिकांचा सवाल _ Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident
राहुड घाटात वारंवार अपघात होत असतानाही या ठिकाणी कायमस्वरूपी आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
धोकादायक वळणे, तीव्र उतार, वाहनांचा वेग आणि ब्रेक फेल होण्याच्या घटना लक्षात घेता राहुड घाटात अधिक प्रभावी वाहतूक सुरक्षाव्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यापूर्वीही राहुड घाटातील समस्यांबाबत निवेदने, उपोषणे आणि आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र आश्वासनांपलीकडे ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी धाव घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहेच; मात्र अपघात होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हीदेखील प्रशासनाची जबाबदारी नाही का? असा थेट सवाल आता नागरिक करत आहेत.
राहुड घाटातील धोकादायक ठिकाणांची तज्ज्ञांकडून पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाय, दिशादर्शक फलक, प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
अन्यथा ठोस उपाययोजना न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.
राहुड घाटाने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवली आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का? की आणखी एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरच उपाययोजना होणार?
प्रतिनिधी : संजय जाधव _ Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident


[…] […]
Finally found a reliable login link that actually works without any lag. Everything is running great on 1xjililogin.