Chandwad Cleaning Workers Salary Payment
चांदवड | प्रतिनिधी
चांदवड नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन अखेर त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने २५ लाख ७६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ५० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थकीत वेतनाची रक्कम वर्ग करण्यात आली. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळावे, यासाठी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर निधी उपलब्ध होऊन कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला. _ Chandwad Cleaning Workers Salary Payment
ऐन रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे वेतन खात्यावर जमा झाल्याने महिला सफाई कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा चौक येथे आयोजित कार्यक्रमात भाऊसाहेब चौधरी यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे यंदाचा रक्षाबंधन सोहळा सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठरला.
दरम्यान, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची दैनिक मजुरी ६२२ रुपये करण्याच्या निर्णयालाही गती मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे थकीत वेतनाचा प्रश्न सुटल्याबरोबरच मजुरी वाढीच्या निर्णयाकडेही कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यावेळी बोलताना भाऊसाहेब चौधरी म्हणाले, “केवळ एका दिवसापुरता सण साजरा करण्यापेक्षा कामगार बहिणींच्या हक्काचे पैसे त्यांना वेळेवर मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात सोबत उभे राहणे हीच खरी रक्षाबंधनाची भेट आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून प्रेरणा घेत कामगार बहिणींच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतल्याचेही चौधरी यांनी सांगितले. _ Chandwad Cleaning Workers Salary Payment
शिवसेना, युवासेना आणि नगरपरिषद परिवाराच्या वतीने संत गाडगेबाबा चौक येथे आयोजित कार्यक्रमात महिला सफाई कर्मचाऱ्यांनी भाऊसाहेब चौधरी यांना राखी बांधून आभार मानले. तीन महिन्यांचे थकीत वेतन खात्यावर जमा झाल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
या कार्यक्रमास शिवसेना गटनेते संदीप उगले, नगरसेवक सुधीर कबाडे, प्रदीप बनकर, राजू बागवान, नगरसेविका पल्लवी मोरे, सुनील मोरे, तालुकाप्रमुख निलेश ढगे, शहरप्रमुख दीपक शिरसाठ, निखिल राऊत, देवा पाटील, प्रशांत ठाकरे यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, नगरपरिषद परिवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी : संजय जाधव _ Chandwad Cleaning Workers Salary Payment


[…] […]