SPPU Nashik Sub-Centre Inauguration
नाशिक | 28 ऑगस्ट 2026 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उत्साहात संपन्न झाले. नाशिक शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन तसेच विद्यापीठाशी संबंधित विविध शैक्षणिक व प्रशासकीय सुविधा स्थानिक पातळीवर अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी हे उपकेंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उद्घाटन समारंभास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्र-कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी व पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. _ SPPU Nashik Sub-Centre Inauguration
नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे 196 महाविद्यालये आणि 32 संशोधन केंद्रांना अधिक प्रभावीपणे सेवा उपलब्ध होणार असून, जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना या उपकेंद्राचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाचे विकेंद्रीकरण होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सेवा व सुविधांसाठी पुणे येथे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. _ SPPU Nashik Sub-Centre Inauguration
उच्च शिक्षण अधिक रोजगाराभिमुख करण्यावरही या उपकेंद्राच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठांनी भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन आधुनिक अभ्यासक्रम विकसित करण्याची गरज व्यक्त केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठांमध्ये इनोव्हेशन, स्टार्टअप्स आणि इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे आवाहन केले.
नाशिकच्या औद्योगिक, कृषी व सेवा क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम विकसित करण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. नाशिक हे भविष्यात महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचे केंद्र बनू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. _ SPPU Nashik Sub-Centre Inauguration
दरम्यान, नाशिक उपकेंद्राच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टता दिली. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र’ हेच नाव कायम राहणार असून, उपकेंद्राला अन्य कोणतेही नाव दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते शिक्षण न देता त्यांना स्वयंसिद्ध आणि रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. वाईन टेक्नॉलॉजी, परकीय भाषा, डेटा सायन्स आणि लिबरल आर्ट्स यांसारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याची दिशा त्यांनी यावेळी मांडली.
नाशिकमध्ये विद्यापीठाचे स्वतंत्र उपकेंद्र असावे, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्या मागणीला आज प्रत्यक्ष स्वरूप मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील उच्च शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि शैक्षणिक प्रशासनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, नगरसेवक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी : प्रथमेश महाले _ SPPU Nashik Sub-Centre Inauguration


[…] SPPU Nashik Sub-Centre Inauguration : मुख्यमंत्री देवेंद्र फ… […]
The game variety here is insane! I love how the slots run without any lag, making the whole experience much more immersive. Highly recommended for slot enthusiasts. Visit evoplayslot
Finally found a site that actually delivers on its bonuses. The game variety is insane and the mobile version works like a charm. Highly recommend 18jilicasino to everyone.