Trimbakeshwar Temple VIP Darshan Decision 2026श्रावण महिन्यात भाविकांना प्राधान्य देण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा VIP दर्शनाबाबत महत्त्वाचा निर्णय.

Trimbakeshwar Temple VIP Darshan Decision 2026

नाशिक | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने VIP दर्शनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भाविकांची वाढती गर्दी, दर्शनासाठी लागणारा वेळ, मंदिर परिसरातील व्यवस्थेवर येणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून देवस्थान ट्रस्टने १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी विशेष नियम लागू केले आहेत.

देवस्थान ट्रस्टच्या निर्णयानुसार, केंद्रीय किंवा राज्य स्तरावरून तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचारासंबंधीच्या लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे VIP दर्शन या कालावधीत बंद राहणार आहे. (Trimbakeshwar Temple VIP Darshan Decision 2026)

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर शिवभक्त दाखल होत असतात. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य मिळावे आणि दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबतच शासकीय विभागांकडून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवरही विभागनिहाय मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार दररोज सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेतच जास्तीत जास्त २० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्रावण महिन्यातील गर्दी लक्षात घेता भाविकांना सुलभ आणि वेळेत दर्शन मिळावे, तसेच मंदिर प्रशासनावरील अतिरिक्त ताण कमी व्हावा, यासाठी देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.

प्रतिनिधी – कुणाल दानेच Trimbakeshwar Temple VIP Darshan Decision 2026

 2 हेक्टर जागा अन् सर्व कागदपत्रे तयार असूनही मंजुरी प्रलंबित; कायमस्वरूपी इमारत होईपर्यंत तात्पुरत्या वर्गांमधून शिक्षण सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Trimbakeshwar Temple VIP Darshan Decision 2026 : भाविकांना प्राधान्य; VIP दर्शनावर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय”
  1. [2973]ufcbet Official Login | Online Slots at Mabilis na GCash Cashout,Gamitin ang ufcbet official login para sa pinakamagandang online slots. I-download ang app at alamin kung paano maglaro ng baccarat. Mag-sign up na rito! visit: ufcbet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed