Nashik Mokhnal Government Ashram School
दिंडोरी तालुक्यातील मोखनळ येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा (यू-डायस क्र. २७२००४०९३०३) भौतिक सुविधांच्या अभावाचे कारण देत बंद करण्यात आली असून, ही शाळा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारला जाईल, असा इशारा मोखनळ येथील युवा नेतृत्व मुन्ना भैय्या महाले यांनी प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी नाशिक, तहसीलदार दिंडोरी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग तसेच शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासकीय निवेदन देण्यात आले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. (Nashik Mokhnal Government Ashram School)
२ हेक्टर जागा तयार, तरीही मंजुरी प्रलंबित
मोखनळ येथील ही शासकीय आश्रमशाळा २ सप्टेंबर २००४ रोजी सुरू झाली होती. त्यानंतर १८ जून २०१८ रोजी झालेल्या समायोजनानंतर भौतिक सुविधांच्या अभावामुळे शाळा बंद पडली.
शाळेसाठी कायमस्वरूपी इमारत उभारण्यासाठी गट क्रमांक २० मधील २.०० हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच स्वतंत्र सातबारा, जमीनमालकाचे संमतीपत्र, दानपत्र तसेच ग्रामपंचायतीचा ठराव अशी आवश्यक कागदपत्रेही प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत.
सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबी पूर्ण असतानाही शाळेच्या इमारत बांधकामासाठीची मंजुरी प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
शालेय शिक्षण समितीच्या भूमिकेकडेही लक्ष
या संपूर्ण प्रकरणाची माहिती यापूर्वी शालेय शिक्षण समितीलाही देण्यात आली होती. मात्र कालांतराने या महत्त्वाच्या विषयाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.(Nashik Mokhnal Government Ashram School)
या प्रकरणात कोणावरही वैयक्तिक दोषारोप करणे किंवा कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करणे हा उद्देश नसून, मोखनळ परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित केंद्रस्थानी ठेवून सर्व संबंधितांनी समन्वयाने या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे, अशी भूमिका ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
“शाळा कायमस्वरूपी सुरू होईपर्यंत तात्पुरत्या वर्गांमध्ये शिक्षण द्यावे”
युवा नेतृत्व मुन्ना भैय्या महाले यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.
«“शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक आदिवासी बालकाचा घटनात्मक अधिकार आहे. भौतिक सुविधांचे कारण देऊन शाळा बंद ठेवल्याने मोखनळ परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कायमस्वरूपी इमारत उभी होईपर्यंत ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्पुरत्या वर्गांमध्ये अध्यापन सुरू करावे. प्रशासनाने व सर्व संबंधितांनी या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा ग्रामस्थ, पालक व स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल.”» (Nashik Mokhnal Government Ashram School)
— मुन्ना भैय्या महाले, युवा नेतृत्व, मोखनळ
प्रशासनासमोर प्रमुख मागण्या
मोखनळ ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत :
१. प्रलंबित प्रस्तावाची सद्यस्थिती स्पष्ट करावी :
शाळेच्या प्रस्तावाची फाईल सध्या नेमक्या कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे, याची अधिकृत माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी.
२. तात्पुरती शाळा तात्काळ सुरू करावी :
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी इमारत होईपर्यंत स्थानिक सहकार्याने तात्पुरत्या वर्गांमध्ये अध्यापन सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत. यासाठी आवश्यक जागा आणि सहकार्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामस्थ स्वीकारण्यास तयार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
३. कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा :
कायमस्वरूपी शाळेच्या इमारतीचे बांधकाम आणि आवश्यक निधी मंजुरीसाठी निश्चित कालमर्यादेसह Action Plan जाहीर करण्यात यावा.
४. संयुक्त बैठक आयोजित करावी :
आदिवासी विकास विभाग, शिक्षण विभाग, महसूल प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करून या प्रश्नावर सकारात्मक आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी तातडीने निर्णयाची मागणी
या निवेदनाच्या प्रती स्थानिक लोकप्रतिनिधींनाही पाठवण्यात आल्या आहेत. शाळेची इमारत, जमीन आणि आवश्यक कागदपत्रांबाबतची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कायमस्वरूपी इमारत उभी होण्यासाठी वेळ लागणार असल्यास तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी तात्पुरत्या वर्गांमधून अध्यापन सुरू करण्याचा पर्याय तातडीने स्वीकारावा, अशी ग्रामस्थांची आग्रही भूमिका आहे.
कोणत्याही प्रकारच्या वादात न पडता मोखनळ परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य देऊन प्रशासन, संबंधित विभाग, शालेय शिक्षण समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी समन्वयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून याप्रकरणी तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास ग्रामस्थ, पालक आणि स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
—प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल Nashik Mokhnal Government Ashram School


[…] 2 हेक्टर जागा अन् सर्व कागदपत्रे तयार … […]
Very professional setup and the withdrawal process is incredibly fast. No more waiting for days to get my winnings. idjitu100 is the real deal.
Finally found a site that doesn’t lag during the big wins. The interface is very user friendly and easy to navigate. Highly recommend pin777login to everyone.
[6043]Kokobet – Link Login Chính Thức | Hướng Dẫn Chơi Baccarat Online,Kokobet cung cấp đường link truy cập an toàn. Hướng dẫn tải app apk nhanh chóng, nạp tiền qua Momo tiện lợi và chia sẻ kinh nghiệm quay hũ thắng lớn. Tham gia ngay! visit: kokobet