Nashik Traffic Management Review By Commissioners
रस्त्यांच्या कामांना मुदत; ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी मार्ग खुले करण्याचे निर्देश
नाशिक शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी द्वारका चौक, मुंबई नाका आणि त्र्यंबक रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करून टप्प्याटप्प्याने रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी या पाहणीदरम्यान वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
द्वारका चौकातून नाशिक-धुळे मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचे निर्देश
द्वारका चौकातील सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना नाशिक-धुळे दिशेने जाणारी वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
एमएसआयडीसीने या कामाला गती देऊन निर्धारित मुदतीत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी दीर्घकालीनदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी काम सुरू असताना नागरिकांना होणारा तात्पुरता त्रास कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला.
कामाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक वॉर्डनची संख्या वाढविण्यात येणार आहे. कंत्राटदार, संबंधित विभाग आणि पोलिस यांच्यात योग्य समन्वय ठेवून या वॉर्डनचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मुंबई नाका ते खडकाळी सिग्नल मार्गावरही कामाला वेग (Nashik Traffic Management Review By Commissioners)
मुंबई नाका परिसरातील वाहतूक व्यवस्थेचाही अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. मुंबई नाका ते गडकरी सिग्नल आणि पुढे खडकाळी सिग्नलपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली.
या मार्गावरील कामाचा एक भाग तातडीने पूर्ण करून नवरात्रोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खुला होणार (Nashik Traffic Management Review By Commissioners)
मुंबई नाका ते एबीबी सर्कल या त्र्यंबक रस्त्यावरील सुरू असलेल्या कामाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
रस्त्यावरील पॅचवर्कची कामे तातडीने पूर्ण करून ३१ ऑगस्टपर्यंत रस्त्याचा एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्यायी बाजूच्या रस्त्यावरून होणारी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी वाहतूक वॉर्डनच्या मदतीने वाहतूक नियंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या लक्षात घेऊन खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वॉर्डनची संख्या वाढणार (Nashik Traffic Management Review By Commissioners)
शहरातील विविध ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वाहनांची ये-जा नियंत्रित करण्यासाठी वाहतूक वॉर्डनची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंत्राटदार, पोलिस आणि संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये समन्वय ठेवून वॉर्डनचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
कामे आवश्यक; मात्र नागरिकांचा त्रास कमी करण्यावरही भर
शहराच्या भविष्यातील आणि दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थेसाठी सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे आवश्यक आहेत. मात्र ही कामे सुरू असताना नागरिकांना होणारा तात्पुरता त्रास कमी करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट कालमर्यादा देण्यात आल्याचे सांगितले. टप्प्याटप्प्याने रस्ते वाहतुकीसाठी खुले करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे आणि वाहतूक व्यवस्थापन यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगितले. संबंधित यंत्रणांनी निश्चित केलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करून रस्त्यांचे मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत, तसेच खड्ड्यांसारख्या तातडीच्या समस्यांवर प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पाहणीवेळी अधिकारी उपस्थित
या पाहणीदरम्यान महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बारवकर, प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी, पोलिस उपायुक्त (परिमंडळ-१) मोनिका राऊत आणि सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांच्यासह एमएसआयडीसी, नाशिक महापालिका, एसटी महामंडळ आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी : दिपक सरोदे Nashik Traffic Management Review By Commissioners


[…] Nashik Traffic Management Review By Commissioners : द्वारका चौक, त्र्य… […]
I was skeptical at first but the withdrawal was processed way faster than I expected. Really trustworthy platform at idsenja128.
Finally a site that doesn’t lag during peak hours. The login process is quick and everything just works perfectly on my phone. I always use jili30login for my daily gaming sessions.
[6129]Vipbet Login PH – Slots na madaling payout gamit ang GCash,Gamitin ang vipbet login ph para sa mabilis na access. Mag-download ng APK at alamin kung paano maglaro ng baccarat. Mag-register na rito! visit: vipbet
This softly reminded me that a piece written with genuine care can lift and reshape the whole feel of an ordinary day. You spoke to me the way a trusted mentor would and that warmth is precisely why the whole message landed so deeply. Here is to countless more pieces just like this and to the wonderful momentum you are so plainly building with each post.