Organ Donation Awareness Program at Hiray Collegeहिरे महाविद्यालयात अवयवदान आणि असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

Organ Donation Awareness Program at Hiray College

पंचवटी, नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बिटको आणि समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे निरामय आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘असंसर्गजन्य आजार व अवयवदानाचे महत्त्व’ या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात वैद्यकीय शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्वप्नील तानाजी सांगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य आजारांविषयी सविस्तर माहिती देतानाच अवयवदानाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक आरोग्याच्या समस्या, कर्करोग यांसारख्या विविध असंसर्गजन्य आजारांची कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याबाबत डॉ. सांगळे यांनी मार्गदर्शन केले. बदलती जीवनशैली, आरोग्यविषयक सवयी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही त्यांनी प्रकाश टाकला. _ Organ Donation Awareness Program at Hiray College

अवयवदानाच्या सामाजिक महत्त्वाविषयी बोलताना डॉ. स्वप्नील सांगळे म्हणाले की, “कोणत्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा किंवा रक्कम न घेता निःस्वार्थ भावनेने केलेले अवयवदान हेच खरे दान असून, समाजात अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करणे हे आजचे मोठे आव्हान आहे.”

अवयवदानामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने अवयवदानाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन याविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

व्याख्यानानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानासाठी पुढाकार घेण्याची तसेच इतर नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली. _ Organ Donation Awareness Program at Hiray College

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वैद्यकीय शास्त्राचे श्री. संतोष अहिरराव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. राकेश पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रकाश शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी हिरवे यांनी केले, तर हर्षाली खैरनार यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रतिनिधी : प्रथमेश महाले _ Organ Donation Awareness Program at Hiray College

Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील FIR च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसचे आंदोलन

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Organ Donation Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना असंसर्गजन्य आजारांबाबत मार्गदर्शन”
  1. Alright, trying my luck with jilislot55 tonight. Fingers crossed! The website’s clean and easy to navigate, which is a HUGE plus. Wish me luck! You wanna give it a shot? Go to: jilislot55

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed