Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices नाशिक शहरातील खड्ड्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस.

Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices

नाशिक | १२ ऑगस्ट २०२६

नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिका प्रशासनाने अखेर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. खड्ड्यांबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी बांधकाम विभागातील पाच कार्यकारी अभियंत्यांसह एकूण १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

संबंधित अभियंत्यांना आपला खुलासा सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अहवाल राज्य शासनाकडे पाठवून पुढील कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.

खड्ड्यांमुळे सहा जणांचा मृत्यू

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विविध कामे आणि त्यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रशासन अॅक्शन मोडवर – Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices

खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत तातडीची बैठक घेत शहरातील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नाशिक महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यानंतर झालेल्या विशेष महासभेत नगरसेवकांनीही प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील जीवघेणे खड्डे, रस्त्यांची दुरवस्था तसेच महापालिका, स्मार्ट सिटी आणि एमएनजीएलच्या विविध कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाकडे जाब विचारला.

आश्वासनानंतरही कामाला अपेक्षित गती नाही – Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices

विशेष महासभेत प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अनेक भागांतील खड्डे बुजविण्याच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे निदर्शनास आले.

नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी करूनही त्यावर आवश्यक ती कार्यवाही न झाल्याचे आढळून आल्याने आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित अभियंत्यांकडून थेट स्पष्टीकरण मागविले आहे.

आयुक्तांच्या या कठोर भूमिकेमुळे महापालिकेच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली असून, आता संबंधित अभियंत्यांना सात दिवसांत समाधानकारक खुलासा द्यावा लागणार आहे. खुलासा असमाधानकारक ठरल्यास राज्य शासनाकडे अहवाल पाठविला जाणार असल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“शहरातील खड्ड्यांबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. संबंधित अभियंत्यांनी सात दिवसांत समाधानकारक खुलासा सादर करावा. अन्यथा अहवाल राज्य शासनाकडे पाठवून पुढील कारवाई केली जाईल.” — मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका

प्रतिनिधी : कुणाल दानेच Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices


Pandhane Bridge Accident Death Toll Two Vani Saputara Highway : पांडाणे पुलावरील अपघातात मृतांचा आकडा दोनवर; उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices : खड्ड्यांकडे दुर्लक्ष; १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, आयुक्तांची कडक कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed