SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (SPPUCTO) यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत कार्यभार निश्चितीमध्ये सर्व शैक्षणिक घटकांचा (All Academic Verticals) समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी विद्यापीठाच्या संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
SPPUCTO संघटनेच्या वतीने प्राध्यापकांच्या विविध शैक्षणिक व सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
संघटनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत : SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020
- NEP-2020 अंतर्गत कार्यभार निश्चितीमध्ये सर्व शैक्षणिक घटकांचा (All Academic Verticals) समावेश करावा.
- UGC/NET-SET पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ मिळावा.
- प्राध्यापकांच्या CAS पदोन्नतीसह प्रलंबित शैक्षणिक व सेवाविषयक प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा.
७ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन
या मागण्यांसाठी ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून विद्यापीठाच्या संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश वाळुंज व सरचिटणीस डॉ. प्रवीण ताटे-देशमुख यांनी आंदोलनाची माहिती दिली.
SPPUCTO संघटनेने शासन तसेच विद्यापीठ प्रशासनाने आपल्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
प्राध्यापकांच्या कार्यभार निश्चिती, पदोन्नती तसेच प्रलंबित शैक्षणिक व सेवाविषयक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी संघटनेची भूमिका आहे.
प्रतिनिधी : प्रथमेश महाले SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020


[…] SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020 : NEP-2020 अंतर्गत सर्व शैक्ष… […]