Nashik Road Railway Station Additional Platform Demand
नाशिक | दि. १२ ऑगस्ट २०२६
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकासकामे; मात्र नाशिकरोड रेल्वेस्थानकातील सध्याचे चार फलाट अपुरे पडण्याची शक्यता
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तब्बल ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीतून विविध विकासकामे केली जात आहेत. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडूनही नाशिकरोडजवळील देवळाली, खेरवाडी, ओढा आणि कसबे सुकेणे या रेल्वेस्थानकांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येत असून, या स्थानकांवर अतिरिक्त नवीन फलाट उभारण्याचे कामही सुरू आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानकातही सुधारणा, नूतनीकरण, विद्यमान फलाटांचे विस्तारीकरण, नवीन ओव्हरब्रिज, होल्डिंग एरिया तसेच रेल्वेस्थानक परिसरातील विविध कामे सुरू आहेत. मात्र, यंदाच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकात अतिरिक्त नवीन फलाट उभारण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचे दिसून येत नाही. (Nashik Road Railway Station Additional Platform Demand)
देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांपैकी एक आणि कुंभमेळ्याचे महत्त्वाचे प्रवेशद्वार असलेल्या नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा विचार करता, सध्या उपलब्ध असलेले चार फलाट भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येच्या दृष्टीने अपुरे पडण्याची शक्यता आहे.
नाशिकरोड शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या आणि रेल्वे वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेता रेल्वेस्थानकाचा अधिक विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे नाशिककरांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर नाशिकरोड येथून थेट नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याची शक्यता, कसारा-मनमाड मार्गावर सुरू असलेले तिसऱ्या-चौथ्या रेल्वे मार्गाचे काम तसेच नाशिकरोड-शिर्डी रेल्वेमार्गाचा विचार करता भविष्यात नाशिकरोड रेल्वेस्थानकाची क्षमता वाढवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन नाशिकरोड रेल्वेस्थानकासाठी अधिक जागा अधिग्रहित करून अतिरिक्त नवीन फलाट उभारावेत, अशी मागणी सध्या नाशिककरांकडून केली जात आहे.
कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींच्या निधीतून विविध पायाभूत सुविधा विकसित होत असताना, नाशिकच्या प्रमुख रेल्वेस्थानकाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अतिरिक्त फलाटांचे नियोजन का करण्यात आले नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
Nashik Road Railway Station Additional Platform Demand


[…] Station Additional Platform Demand : कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा निधी, तरी अतिरिक्त फलाटांचे […]
Super impressed with the fairness of the games here. I feel like I actually have a chance to win. Really happy with idgg189 so far.