Nashik Heavy Rain Threat Easesनाशिकवरील ढगफुटीसदृश्य पावसाचा संभाव्य धोका कमी; भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याने प्रशासनाची सतर्कता कायम.

Nashik Heavy Rain Threat Eases

MHDU News प्रतिनिधी : दीपक सरोदे

नाशिक : नाशिक जिल्ह्यावर मंगळवारी ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात अल्पावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यामुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले होते.

मात्र, ताज्या हवामान घडामोडींनुसार नाशिकसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामानातील बदलामुळे ढगफुटीसदृश्य पावसाला कारणीभूत ठरणारा वातावरणीय भोवरा (Vortex) नाशिकवरून पुढे सरकला असून त्याची हालचाल उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने आणि दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराच्या दिशेने होत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे नाशिकवरील संभाव्य मोठा धोका सध्या कमी झाला असला, तरी नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी पालघर जिल्ह्यात याच वातावरणीय प्रणालीच्या प्रभावामुळे तब्बल ४५० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर हा प्रभाव त्र्यंबकेश्वरमार्गे नाशिककडे सरकेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, हवामानातील बदलामुळे त्याची दिशा बदलली असून अकोले परिसरासाठी आता विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिकच्या घाटमाथा परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नदी-नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा केले आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. तसेच श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी गडावरील दर्शन व्यवस्थेतही खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. पुढील २४ तास हवामानातील बदल महत्त्वाचा ठरणार असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचना आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांचे पालन करावे.

Nashik Heavy Rain Threat Eases

नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा; त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, शाळा- कॉलेजांना सुटी, जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे 5 मोठे निर्णय

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Nashik Heavy Rain Threat Eases : नाशिकवरील ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका टळला; भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याने हाय अलर्ट”
  1. [620]Đá Gà Trực Tiếp (sabong67) – Nhà Cái Cá Cược Thomo Uy Tín,Sabong67 là địa chỉ xem đá gà trực tiếp Thomo uy tín nhất. Cá cược an toàn, tỷ lệ thưởng cao, nạp rút nhanh chóng và hỗ trợ 24/7. Đăng ký Sabong67 nhận ngay ưu đãi! visit: sabong67

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed