Tukaram Mundhe food safety action in Sinnar against open edible oil and unlabeled farsanसिन्नरसह नाशिक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर खुले खाद्यतेल आणि विनालेबल फरसाण विक्रीत मोठी घट.

Tukaram Mundhe Food Safety Inspection Nashik

नाशिक सिन्नर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षेबाबत सुरू केलेल्या कठोर तपासणी मोहिमेचा परिणाम आता बाजारपेठेत स्पष्टपणे दिसून येत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईनंतर सिन्नरसह नाशिक जिल्ह्यातील अनेक किराणा दुकानांमधून खुले स्वरूपात विकले जाणारे खाद्यतेल आणि लेबलविरहित फरसाण जवळपास पूर्णपणे गायब झाले आहे.

यापूर्वी अनेक दुकानांमध्ये ड्रममधून सोयाबीनसह विविध खाद्यतेलांची सुटी विक्री होत होती. मात्र, अन्नसुरक्षा नियमांनुसार अशा प्रकारची विक्री बेकायदेशीर असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. कारवाईच्या धास्तीमुळे घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी खुले तेल विक्रीला पूर्णविराम दिला असून आता ग्राहकांना प्रामुख्याने पॅकबंद खाद्यतेल उपलब्ध होत आहे.

याचप्रमाणे, पूर्वी विविध भागांतून विनालेबल फरसाण विक्रीसाठी पाठविले जात होते. अनेक उत्पादनांवर उत्पादकाची माहिती, उत्पादन दिनांक, मुदत किंवा एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळून येत होते. आता बाजारात आवश्यक माहिती असलेले, नियमानुसार पॅकिंग केलेले आणि लेबलयुक्त फरसाणच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले आहे.

अन्नसुरक्षा नियमांनुसार खाद्यपदार्थांच्या पॅकिंगवर ब्रँडचे नाव, उत्पादकाचा संपूर्ण पत्ता, उत्पादन व पॅकिंगची तारीख, वजन, बॅच क्रमांक तसेच एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. तसेच खाद्यतेलाची विक्री शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणित पॅकमध्येच करण्याची तरतूद आहे.

खुल्या खाद्यतेलामध्ये भेसळीची शक्यता अधिक असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी पॅकबंद आणि प्रमाणित अन्नपदार्थांचा वापर करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

MHDU News : VIshal Bhadane Tukaram Mundhe Food Safety Inspection Nashik

नाशिकवरील ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका टळला; भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याने हाय अलर्ट

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Tukaram Mundhe Food Safety Inspection Nashik : तुकाराम मुंढेंचा दणका! सिन्नरसह जिल्ह्यात किराणा दुकानांतून खुले खाद्यतेल व विनालेबल फरसाण वर कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed