Nashik FDA Five Food Establishments License Suspension
नाशिक : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक जिल्ह्यात अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत त्रुटी आढळल्याने पाच खाद्य आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये – Nashik FDA Five Food Establishments License Suspension
- सायली रेस्टॉरंट अँड बार – सातपूर,
- हॉटेल छोटे मिया – कॉलेज रोड,
- मणी मार्क – पेठ रोड, पंचवटी,
- अभिषेक बेकरी अँड स्वीट्स – सिडको
- मोहनलाल नमकीन – दिंडोरी यांचा समावेश आहे.
FDAच्या तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांची निर्मिती, साठवणूक, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे मणी मार्क, पंचवटी येथून सोनपापडी, गुलाबजामून आणि मिल्क बर्फीचा तब्बल 1,236.9 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे ₹1 लाख 91 हजार 900 असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईतून खाद्य व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्नाची योग्य साठवणूक, अन्न हाताळणी, कीटक नियंत्रण तसेच अन्नसुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाकडून यापुढेही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.
-प्रतिनिधी : कुणाल दानेच Nashik FDA Five Food Establishments License Suspension


[…] […]
[9895]sss66 | Link vào sss66 và hướng dẫn chơi baccarat online,sss66 cung cấp link vào sss66 không bị chặn. Tải app sss66 nhanh chóng để nạp tiền qua Momo và khám phá mẹo quay hũ nổ hũ dễ thắng. Truy cập ngay để trải nghiệm. visit: sss66
Great vibes and an even better selection of betting options. It is rare to find a site this stable and responsive. Keep it up 45tbet!