Ahilyadevi Holkar Punyatithi Rangmahal Chandwadचांदवडच्या ऐतिहासिक रंगमहालात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा व राजगादीचे पूजन.

Ahilyadevi Holkar Punyatithi Rangmahal Chandwad

चांदवड : होळकर उपराजधानी चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहाल (होळकरवाडा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक वेद मंत्रांच्या स्तवनाने शांतिपाठ, प्रतिमा पूजन तसेच राजगादीचे पूजन करण्यात आले.

होळकर राजघराण्याचे राजपुरोहित अमोल दीक्षित गुरूजी, कृष्णा दीक्षित, वेदमूर्ती आर्चित दीक्षित, भूषण दीक्षित व किशोर दीक्षित यांनी पौरोहित्य केले.

यावेळी स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रासह त्यांच्या न्यायव्यवस्थेतील कार्यावर प्रवचनातून प्रकाश टाकत उपस्थितांचे प्रबोधन केले.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी देणारे आहे,” असे प्रतिपादन स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.

याप्रसंगी रोहितराव होळकर, स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज, भीमराव राजोळे, भाऊसाहेब राजोळे, रामेश्वर राजोळे, अशोक काका व्यवहारे, ॲड. शलाका पाटील, नगराध्यक्ष वैभव बागुल, प्रा. डॉ. सुरेश पाटील, एम. के. पवार (व्यवस्थापक, रंगमहाल), सुभाष पवार (सहाय्यक व्यवस्थापक), प्राचार्य दत्तात्रय बारगळ, नगरसेवक डॉ. जीवन देशमुख, अरुण पवार, पिंटू राऊत, बाळा पाडवी, अमोल कोतवाल, ॲड. सचिन कुलकर्णी, इंजि. तुषार सोनवणे, नारायण कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.

-चांदवड प्रतिनिधी : संजय जाधव Ahilyadevi Holkar Punyatithi Rangmahal Chandwad

Nashik Crime News Ambad Unit 3 Arrest : खुनाचा प्रयत्न व दंगा या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा अंबड युनिटच्या ताब्यात

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Ahilyadevi Holkar Punyatithi Rangmahal Chandwad : चांदवडच्या ऐतिहासिक रंगमहालात प्रतिमा व राजगादीचे पूजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed