Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana Chandwad
चांदवड : अनाथ, निराधार, एकल पालकांची तसेच विविध कारणांमुळे संगोपनाची गरज असलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. चांदवड तालुक्यातील पात्र बालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते चांदवड तालुक्यातील पात्र लाभार्थी बालकांना या योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी लाभार्थींना प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.
या योजनेंतर्गत अनाथ व निराधार बालके, आई किंवा वडील गमावलेली बालके, एकल पालकांची बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके तसेच विशेष कौटुंबिक किंवा आपत्तीजन्य परिस्थितीतील पात्र बालकांचा समावेश होऊ शकतो. पात्र बालकांना दरमहा ₹2,250 आर्थिक सहाय्य देण्यात येते._ Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana Chandwad
या आर्थिक सहाय्यामुळे बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन संगोपनासाठी कुटुंबाला मोठी मदत मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे बालकांच्या शिक्षणावर किंवा संगोपनावर परिणाम होऊ नये, तसेच त्यांना सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. _ Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana Chandwad
यावेळी आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांनी या योजनेमुळे गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना मोठा आधार मिळणार असल्याचे सांगून, पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचाही गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
चांदवड तालुक्यातील योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या अनाथ, निराधार व एकल पालकांच्या बालकांच्या पालकांनी किंवा पालकत्वाची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, बालविकास अधिकारी सचिन शिंदे, नगराध्यक्ष वैभव बागुल, भाजप ज्येष्ठ नेते अशोक भोसले, भाजप ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष गीताताई झाल्टे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष कल्याणी कुलकर्णी, शांताराम भवर, योगेश ढोमसे, डॉ. स्वातीताई देवरे, नगरसेविका सरला अग्रवाल, नगरसेविका मंगल मोरे, नगरसेविका नयना वाघ, नगरसेविका जयश्री प्रजापत, नगरसेविका पूनम बांगरे, सुरेश पाटील, रघुनाथ काळे, बाजीराव वानखेडे, विजय धाकराव, देविदास आहेर, अमोल देवरे, पिंटू भोईटे, मिलिंद खरे, राहुल कोतवाल, वर्धमान पांडे, बापू शिंदे, मुन्ना गांधी, अरुण देवढे, जीवन देशमुख, संभाजी गुंजाळ, राहुल केदारे, दीपक उशीर, गणेश ठाकरे, कसिफ खान, आत्माराम खताळ तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी : संजय जाधव _ Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana Chandwad


[…] Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana Chandwad : क्रांतिज्योती … […]
The app version is just perfect. I can play anywhere and the rewards keep coming in. Download jiligemsapp and see for yourself.
Honestly, this is one of the most stable sites I have used recently. The loading speed is great and the interface is very friendly for beginners. Highly recommend phjljl7777 for anyone looking for a smooth experience!
Solid platform with a very intuitive layout. I love how easy it is to navigate between different games. Five stars from me. logincendanabet
Really impressed with the customer support here. They answered my questions about the deposit process in minutes. phd63com is definitely one of the more trustworthy options out there.
Best gaming experience I’ve had in a while. The graphics are crisp and the wins feel fair. You should give phpisoking a try if you like excitement.