Nashik Citylink Bus Mangalsutra Theft Satpur Police
नाशिक : सिटी लिंक बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. त्र्यंबकेश्वरहून पिंपळगाव बहुलाकडे प्रवास करत असताना ही चोरी झाली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्याची किंमत तब्बल ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे बस प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ ते रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सौ. तेजस्विनी योगेश पिंगळ (वय ३०, रा. निळवंडी रोड, ता. दिंडोरी) या सिटी लिंक बस क्रमांक MH 15 GY 7757 मधून त्र्यंबकेश्वरहून पिंपळगाव बहुलाच्या दिशेने प्रवास करत होत्या. _ Nashik Citylink Bus Mangalsutra Theft Satpur Police
बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हेरले. गर्दीमध्ये संधी साधून चोरट्याने काहीतरी धारदार वस्तूचा वापर करून महिलेच्या गळ्यातील सुमारे एक तोळे वजनाची सोन्याची चैन-मंगळसूत्र (छोटी पोत) कापली आणि तेथून लंपास केले. _ Nashik Citylink Bus Mangalsutra Theft Satpur Police
प्रवासादरम्यान दागिना चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने याबाबत पोलिसांकडे धाव घेतली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्याची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणारा आरोपी अद्याप अज्ञात असून, त्याला अटक झालेली नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. बसमधील गर्दी, प्रवाशांची वर्दळ आणि चोरीच्या पद्धतीचा विचार करून पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक खरपडे करीत आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास करताना गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने, मोबाईल, पर्स आदी वस्तूंबाबत प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
विशेषतः गर्दीच्या बसमध्ये चढताना-उतरताना तसेच प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींच्या हालचालींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, सिटी लिंक बसमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कापून चोरी केल्याच्या या घटनेचा तपास सुरू असून, आरोपी कधी पोलिसांच्या हाती लागतो याकडे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी : कुणाल दानेच _ Nashik Citylink Bus Mangalsutra Theft Satpur Police


Super easy to navigate and the customer service is on point. I feel safe depositing my funds here. Keep it up krwego88!
The login process is seamless and I love the daily rewards they offer. It keeps things exciting. Definitely visit ng88login today.
Honestly the best experience I have had in a while. The interface is smooth and the payouts are fast. Highly recommend idperangjitu to everyone.
I’ve tried a few platforms lately but this one really stands out. The loading speed is impressive and the interface is super friendly. Definitely my new go-to spot! phjilibey
Found this place through a friend and it did not disappoint. The bonuses are actually useful and not just marketing fluff. Love playing at bdok777bet
The bonuses at jili90club are actually decent compared to other places. I had a great run last night and the withdrawal process was surprisingly quick. Great experience so far!