Nashik Rto School Van Drivers Morcha
आरटीओ प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या निषेधार्थ तसेच खासगी स्कूल व्हॅन चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ कामकाजावर परिणाम झाला, तर परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. _ Nashik Rto School Van Drivers Morcha
या मोर्चात खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील यांच्यासह महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी, खासगी स्कूल व्हॅन चालक आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आरटीओकडून स्कूल व्हॅन चालकांवर करण्यात येणाऱ्या आर्थिक दंडात्मक कारवाईचा आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध केला. विशेषतः सातपेक्षा अधिक आसन क्षमतेच्या नियमाचा आधार घेत चालकांवर कारवाई केली जात असून, या कारवाईमुळे चालकांवर आर्थिक बोजा वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. स्कूल व्हॅनच्या आसन क्षमतेबाबत योग्य तो तोडगा काढावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
खासगी स्कूल व्हॅन चालक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत ने-आण करण्याचे काम करतात. मात्र, विविध नियम आणि त्याअंतर्गत होणाऱ्या दंडात्मक कारवाईमुळे चालकांच्या व्यवसायावर मोठा आर्थिक परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. वाहनांची तपासणी आणि कारवाईच्या नावाखाली चालकांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
याशिवाय आनंद दिघे महामंडळाच्या नावाखाली वसुली केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, या प्रकाराचीही दखल घेण्याची मागणी करण्यात आली._ Nashik Rto School Van Drivers Morcha
स्कूल व्हॅन चालकांवरील आर्थिक दंडात्मक कारवाई तात्काळ थांबवावी, सातपेक्षा अधिक आसन क्षमतेच्या नियमाबाबत व्यवहार्य तोडगा काढावा आणि चालकांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर शासन व आरटीओ प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, चालकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह स्कूल व्हॅन चालकांनी दिला आहे. त्यामुळे आता आरटीओ प्रशासन या आंदोलनाची आणि चालकांच्या मागण्यांची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-प्रतिनिधी : कुणाल दाणेच _ Nashik Rto School Van Drivers Morcha


[…] […]
[…] […]
Login process is very secure and quick. I love how they handle user accounts and the bonuses are actually generous. Try jili01casinologin today.