Ambad Link Road Accident Sunil Borse
नाशिक : अंबड लिंक रोडवरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल्याने नाशिककरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सातपूर कॉलनी येथील रहिवासी सुनील बोरसे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अंबड लिंक रोडवरील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक नियोजनाचा अभाव की वाहनचालकांची बेफिकिरी—या दुर्घटनेला नेमके जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ‘अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’ असा संतप्त सवाल नाशिककरांकडून केला जात आहे._ Ambad Link Road Accident Sunil Borse
रस्त्यांवरील खड्डे आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असताना, नागरिकांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांना रस्त्यांच्या दुरवस्थेच्या प्रश्नावर धारेवर धरले आहे. संबंधित यंत्रणांनी केवळ अपघातानंतर पाहणी न करता, या दुर्घटनांची मूळ कारणे शोधून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासन व प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र अपघात प्रतिबंध व मदत समिती स्थापन करून, अपघातानंतर पीडित कुटुंबांना तातडीने मदत मिळेल, अशी यंत्रणा उभी करण्याची मागणीही पुढे आली आहे.
निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
अंबड लिंक रोडवर अजून किती बळी जाण्याची वाट पाहिली जाणार?
दरम्यान, सुनील बोरसे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
प्रतिनिधी : दिपक सरोदे _Ambad Link Road Accident Sunil Borse


[…] […]
Super happy with the service here. The community is great and the games are always updated. Definitely worth a try for everyone. pkcv777