Nashik School College Road Romeo Student Safety
नाशिक शहरातील शाळा, महाविद्यालये आणि क्लासेसच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा-कॉलेज भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत काही ठिकाणी रोडरोमिओ आणि टवाळखोरांचा वावर असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत.
विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, शेरेबाजी करणे, विनाकारण शैक्षणिक परिसरात थांबणे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारांमुळे पालकांमध्ये चिंता निर्माण होत आहे. यापूर्वीही नाशिक शहरातील विविध शैक्षणिक परिसरांमध्ये टवाळखोर आणि रोडरोमिओंविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. _ Nashik School College Road Romeo Student Safety
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिसांचे दामिनी आणि निर्भया पथक कार्यरत आहे. मात्र, शाळा-कॉलेज सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत संवेदनशील परिसरात पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
शाळा, कॉलेज आणि क्लासेसच्या परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था प्रभावी करणे, आवश्यक ठिकाणी महिला पोलिसांची गस्त वाढवणे तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे तक्रार करता यावी यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
सोशल मीडिया आणि ऑनलाइन माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी होणारा संपर्क, खोटी आश्वासने, प्रलोभने किंवा ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकारांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तो लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे.
पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळा, कॉलेज किंवा क्लासच्या वेळापत्रकाची माहिती ठेवावी. मुलगा किंवा मुलगी नियमितपणे शाळा, कॉलेज किंवा क्लासला जात आहे का, वेळेत घरी परतत आहे का, याची माहिती घ्यावी. मात्र, मुलांवर केवळ संशय न घेता त्यांच्याशी विश्वासाने संवाद साधणेही तितकेच महत्त्वाचे आहे. _ Nashik School College Road Romeo Student Safety
शाळा आणि महाविद्यालय प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रवेशद्वाराबाहेरील परिसर, पार्किंग, बसथांबे आणि विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
विद्यार्थिनींना पाठलाग, छेडछाड, धमकी, अश्लील संदेश किंवा ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागत असल्यास त्यांनी गप्प बसू नये. पालक, शिक्षक किंवा पोलिसांच्या मदतीने तातडीने योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
नाशिकमधील शैक्षणिक परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी पालक, शैक्षणिक संस्था आणि पोलिस यांच्यात समन्वय वाढणे ही काळाची गरज आहे. शाळा-कॉलेज भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत दामिनी पथक तसेच पोलिसांची गस्त वाढवावी आणि रोडरोमिओंच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
प्रतिनिधी : दिपक सरोदे _ Nashik School College Road Romeo Student Safety


[…] Nashik School College Road Romeo Student Safety : नाशिकच्या शाळा-कॉल… […]
Alright alright, checked out iv88slot last night. It’s alright, nothing crazy but enough to pass the time. Give it a sus iv88slot.