Prize Distribution at Hiray College Nashik
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथे ‘मेरा युवा भारत, नाशिक’ यांच्या वतीने आयोजित ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ या जिल्हास्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार श्री. राजेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, देशासमोरील विविध ज्वलंत समस्यांपैकी व्यसनाधीनता ही अत्यंत गंभीर समस्या असून युवकच जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम ठरू शकतात. अशा उपक्रमांमधून व्यसनमुक्त व सशक्त समाजाच्या निर्मितीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होते तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो, असे सांगितले. त्यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धांमध्ये जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत गायन, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व, लोकगीत, स्लॅम पोएट्री (काव्यवाचन), शॉर्ट फिल्म, शॉर्ट रील्स, नुक्कड नाटक आणि घोषवाक्य लेखन अशा विविध प्रकारांद्वारे व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश दिला.
Prize Distribution at Hiray College Nashik
🏆 स्पर्धेतील पारितोषिक विजेते
🎭 नुक्कड नाटक
- प्रथम : एमजीवी पंचवटी, नाशिक
- द्वितीय : के.डी.जी.एम. निफाड महाविद्यालय, नाशिक
- तृतीय : व्ही. एन. नाईक महाविद्यालय, नाशिक
🗣️ वादविवाद / भाषण
- प्रथम : मोमीन आयेशा सिद्दिकी
- द्वितीय : साबिया तशनीम
- तृतीय : ऋतुजा कांबळे
🎶 लोकगीत
- प्रथम : एम.एस.जी. महाविद्यालय, मालेगाव
- द्वितीय : सीनियर कॉलेज, मालेगाव
🎨 चित्रकला
- प्रथम : ओमाक्षी शेखर बागडे
- द्वितीय : रुचिका स्वप्निल साठे
- तृतीय : खुशी रासबिहारी प्रजापती
💃 नृत्य
- प्रथम : हिरे विद्यालय, नाशिक
- द्वितीय : मानसी पाठक ग्रुप
🎬 शॉर्ट फिल्म / शॉर्ट रील्स
- प्रथम : एम.एस.जी. महाविद्यालय, मालेगाव
- द्वितीय : वन लास्ट दोस्त
✍️ स्लॅम पोएट्री (काव्यवाचन)
- प्रथम : तोश्विता यशवंत पवार
- द्वितीय : सीमा हिरामण खोटरे
- तृतीय : अर्जुन तुषार वाघ
📝 घोषवाक्य लेखन
- प्रथम : पियुष महाले
- द्वितीय : रुद्र भामरे
- तृतीय : साक्षी भोसले व हर्षदा थोरात
Prize Distribution at Hiray College Nashik
याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी श्री. अभिलाष म्हस्के, उपप्राचार्य यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीप्ती देवरे यांनी केले, तर सुनील पंजे यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रतिनिधी : प्रथमेश महाले Prize Distribution at Hiray College Nashik


[…] […]