Nashik Housemaid Arrested Gold Theft Case
नाशिक | ३१ जुलै २०२६: मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने अवघ्या १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणी घरात काम करणारी दर्शना गंगाराम गांगड (वय २०, रा. चुंचाळे, अंबड) हिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी चौक परिसरातील रहिवासी नमिता शैलेश राजहंस यांच्या घरातून मंगळवारी (२८ जुलै) दुपारच्या सुमारास १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हेशोध पथकाने संशयित महिला दर्शना गांगड हिचा शोध घेतला. महिला पोलिस अमलदार दीपाली देशमुख, आम्रपाली पगारे आणि मोहिनी चव्हाण यांनी तिची कसून चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेले सुमारे १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. संशयितेला मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक रोहिदास सोनार करीत आहेत.
– प्रतिनिधी: कुणाल दाणेच Nashik Housemaid Arrested Gold Theft Case


[…] 11 तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार… […]