President Medal Reissued to Home Guard Ashok Vyavahareहरवलेले राष्ट्रपती पारितोषिक पदक शासनाकडून नव्याने उपलब्ध; चांदवडच्या अशोक व्यवहारे यांना पुन्हा मिळाला सन्मान.

President Medal Reissued to Home Guard Ashok Vyavahare

चांदवड | प्रतिनिधी

चांदवड येथील होमगार्ड दलातील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पारितोषिकाने गौरविण्यात आलेले अशोक (काका) व्यवहारे यांना त्यांचे हरवलेले पारितोषिक पदक शासनाकडून नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निर्णयामुळे चांदवड परिसरात समाधान व्यक्त होत असून शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले जात आहे.

अशोक व्यवहारे यांना होमगार्ड दलातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते राष्ट्रपती पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. चांदवड तालुक्यातील हे एकमेव राष्ट्रपती पारितोषिक असल्यामुळे या सन्मानाला विशेष महत्त्व आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या गर्दीत हे पदक हरवले होते. त्यानंतर व्यवहारे यांनी चांदवड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी संबंधित शासकीय विभागांशी सातत्याने संपर्क ठेवत मुख्यमंत्री कार्यालय तसेच राष्ट्रपती कार्यालयाशी आवश्यक पत्रव्यवहार केला.

या संपूर्ण प्रक्रियेत चांदवड मर्चंट बँकेचे कर्मचारी तसेच मित्रपरिवारानेही सहकार्य केले. पाठपुराव्यानंतर शासनाने नव्याने राष्ट्रपती पारितोषिक पदक उपलब्ध करून दिल्याने अशोक व्यवहारे यांनी शासन आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. या घटनेमुळे चांदवडकरांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

– प्रतिनिधी : संजय जाधव President Medal Reissued to Home Guard Ashok Vyavahare

चांदवड-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; मनमाडच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “President Medal Reissued to Home Guard Ashok Vyavahare : हरवलेले राष्ट्रपती पारितोषिक पदक शासनाकडून पुन्हा प्रदान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed