Sachin Ahir Deputy Chairman Nominationशिवसेना (शिंदे गट)च्या पाठिंब्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज.

Sachin Ahir Deputy Chairman Nomination

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना (शिंदे गट)च्या पाठिंब्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. (Sachin Ahir Deputy Chairman Nomination)

याच दिवशी सचिन अहिर यांनी ठाकरे गटाशी संबंधित भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कामगार सेना या संघटनांतील आपल्या पदांचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी पक्षाने दिलेल्या विश्वासाबद्दल आणि संधीबद्दल आभार मानत, काही अपरिहार्य कारणांमुळे पदांचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. (Sachin Ahir Deputy Chairman Nomination)

राजकीय वर्तुळात ही घडामोड ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, विविध राजकीय हालचालींमुळे वातावरण अधिकच तापले आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Sachin Ahir Deputy Chairman Nomination)

महादूत जनबिंदू : विशाल भदाणे

Sachin Ahir Deputy Chairman Nomination
शिवसेना (शिंदे गट)च्या पाठिंब्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज.

नसरापूर प्रकरण : ‘आई म्हणून मन हेलावलं, पण कर्तव्याला प्राधान्य दिलं’; विजयमाला पवार यांची भावूक प्रतिक्रिया

Sachin Ahir Deputy Chairman Nomination

Mumbai : A major political development unfolded in Maharashtra on Tuesday as Shiv Sena (UBT) MLA Sachin Ahir filed his nomination for the Deputy Chairman of the Maharashtra Legislative Council with the support of the Shiv Sena led by Eknath Shinde.

Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister and Shiv Sena leader Eknath Shinde, and Deputy Chief Minister Ajit Pawar were present during the filing of the nomination.

On the same day, Sachin Ahir also resigned from his positions in the Bharatiya Kamgar Sena and BEST Kamgar Sena, organisations associated with the Shiv Sena (UBT). In his resignation letter addressed to Uddhav Thackeray, Ahir thanked the party for the trust and responsibilities entrusted to him, stating that he was stepping down due to unavoidable reasons.

The development is being viewed as a significant political setback for the Uddhav Thackeray camp. With Maharashtra witnessing rapid political realignments in recent weeks, attention is now focused on the next moves of the state’s political leadership. Meanwhile, Deputy Chief Minister Eknath Shinde is expected to address a press conference regarding the latest developments.

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Sachin Ahir Deputy Chairman Nomination : सचिन अहिर शिंदे गटात; विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज, ठाकरे गटाला मोठा धक्का”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *