Traditional Lezim Welcome at Nashik Wedding Ceremonyम्हसरूळ येथील शुभेच्छा लॉन्समध्ये साई लेझीम पथकाने पारंपरिक लेझीमच्या तालावर वधू-वरांचे आगळेवेगळे स्वागत केले.

Traditional Lezim Welcome at Nashik Wedding Ceremony

नाशिक |

आधुनिकतेच्या युगात लग्नसमारंभांमध्ये डीजे, भव्य देखावे आणि हिडीस नृत्याचा वाढता प्रभाव दिसून येत असताना, नाशिकमध्ये एका विवाह सोहळ्यात मराठमोळ्या परंपरेचे अनोखे दर्शन घडले. इंदिरानगर येथील शिव कॉलनीतील सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका माई बुचके आणि त्यांच्या साई लेझीम पथकातील महिला सदस्यांनी लेझीमच्या तालावर वधू-वरांचे केलेले स्वागत उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले.

म्हसरूळ येथील शुभेच्छा लॉन्स येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात वधू-वर मंडपात आल्यानंतर आणि लग्नविधीच्या व्यासपीठावर विराजमान होईपर्यंत “बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है…” या सवाद्य धूनच्या साथीने पारंपरिक लेझीम कवायत सादर करण्यात आली. आधुनिक देखावा आणि हिडीस नृत्याला फाटा देत महिलांनी नऊवारी साडी, पारंपरिक नट्टापट्टा आणि मराठमोळ्या वेशभूषेत केलेले स्वागत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

नाशिक ढोलच्या दमदार तालावर लेझीम खेळत वधू-वरांना मंडपात आणण्यात आले. स्टेजवर पोहोचल्यानंतर हिंदी व मराठी गीतांच्या तालावरही लेझीमचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी महिला लेझीम पथकाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत तोंडभरून कौतुक केले.

लग्नविधी संपन्न झाल्यानंतर वधू-वरांसह त्यांच्या मामा-मामी आणि इतर महिलांनीही लेझीमच्या तालावर उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आनंद साजरा केला.

या कार्यक्रमासाठी लेझीम पथकाच्या अध्यक्षा रुपाली बेंडाळे, राधा बुचके तसेच पथकातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयातून साकारलेला हा उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम विवाह सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला.

कार्यक्रमाच्या शेवटी वधू-वरांच्या पालकांनी महिला लेझीम पथकाचा सन्मान करत भेटवस्तू व बक्षिस देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत आधुनिक लग्नसमारंभांना नवी दिशा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

Traditional Lezim Welcome at Nashik Wedding Ceremony

एसटीच्या भाड्यात १३.५८% वाढ; महागाईत सामान्य प्रवाशांच्या खिशाला पुन्हा कात्री

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Traditional Lezim Welcome at Nashik Wedding Ceremony : लेझीमच्या पारंपरिक तालात वधू-वरांचे अनोखे स्वागत; महिला पथकाच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *