SNJB Ideal Teacher and Non-Teaching Staff Award Ceremonyएसएनजेबी जैन गुरुकुल, चांदवड येथे अचिव्हमेंट अवॉर्ड्स २०२५-२६ अंतर्गत १७ शिक्षक-शिक्षकेतर सेवकांचा सन्मान करण्यात आला.

SNJB Ideal Teacher and Non-Teaching Staff Award Ceremony

चांदवड : एसएनजेबी जैन गुरुकुल, चांदवड या संस्थेत संस्थापक पूज्य काकाजी यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त ‘अचिव्हमेंट अवॉर्ड्स २०२५-२६’ अंतर्गत आदर्श शिक्षक-शिक्षकेतर सेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमांतर्गत मागील शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण १७ शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता मध्यवर्ती कार्यालयाजवळील संस्थापक पूज्य काकाजी यांच्या तसेच प्रतिकूल परिस्थितीत काकाजींना मोलाचे सहकार्य करणारे स्व. प्रागजीभाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर काकाजींच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले. _ SNJB Ideal Teacher and Non-Teaching Staff Award Ceremony

यानंतर स्वामी बँक्वेट हॉल, इच्छापूर्ती गणेश मंदिर कॉर्नर, चांदवड येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. नवकार महामंत्र व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विश्वस्त मंडळाचे सदस्य तथा प्रबंध समितीचे मानद सचिव झुंबरलालजी भंडारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मागील वर्षभरात एसएनजेबी परिवारातील निधन झालेल्या सदस्यांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे आणि विधान परिषद नाशिक शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून संस्थेच्या पुढील वाटचालीतही संपूर्ण समर्पित भावनेने सेवा देण्याचे आवाहन केले. _ SNJB Ideal Teacher and Non-Teaching Staff Award Ceremony

यानंतर प्रमुख अतिथींचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, आमदार सत्यजित तांबे, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट रविंद्र बेलपाठक, चांदवड नगराध्यक्ष वैभव बागुल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यासह संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे प्राचार्य व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर सेवक, पुरस्कारार्थी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना प्रातिनिधिक स्वरूपात प्रा. डॉ. स्वप्ना थोरात आणि कार्यालयीन अधीक्षक मधुकर रौंदळ यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी केले. पुरस्कार वितरणाची संपूर्ण प्रक्रिया तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. संतोष संचेती, प्रा. डॉ. राजीव भंडारी आणि त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले.

प्रतिनिधी : संजय जाधव _ SNJB Ideal Teacher and Non-Teaching Staff Award Ceremony

Himalayan Glaciers and Environmental Threat : हिमालयातील बर्फ वितळण्याचा वाढता धोका; भारत-चीन-नेपाळ-भूतानने एकत्र येण्याचे आवाहन

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “SNJB Ideal Teacher and Non-Teaching Staff Award Ceremony : एसएनजेबी संस्थेत आदर्श शिक्षक-शिक्षकेतर सेवक पुरस्कारांचे वितरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed