Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi
नाशिक | प्रतिनिधी सोपान रणपिसे : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे दाखल करण्यात आलेल्या FIR च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे हे आंदोलन करण्यात आले. _ Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे भाजप व आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडून कथितरीत्या शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडत संबंधित घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
यानंतर हल्द्वानी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
जातीय भेदभाव, दलितांवरील अन्याय-अत्याचार तसेच सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठविणाऱ्यांवर दडपशाही करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. अशा प्रकारच्या राजकारणाचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. _ Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi
“भाजप आणि आरएसएसच्या मनुवादी कृतीचा निषेध असो”, “जातीवादी सरकारचा धिक्कार असो”, “जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणांनी आंदोलनस्थळ परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाचे नेतृत्व ज्ञानेश्वर काळे आणि जयेश पोकळे यांनी केले. आंदोलनात मध्य ब्लॉक अध्यक्ष जाकीर अत्तार, मुश्ताक कुरेशी, जावेद पठाण, इसाक कुरेशी, दत्तात्रय सोनवणे, संतोष कस्तुरे, जावेद शेख, दत्तात्रय वाघ, हर्षल कापडणीस, गोरख साळवे, अमोल मरसाळे, अरुण दोंदे, मंगेश लहामगे, संदीप वाघ, अशोक शेंडगे, शंकर जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी : सोपान रणपिसे _ Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi


[…] […]