Nashik Pothole Accident Sujit Gaikwad
नाशिक : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे पुन्हा एकदा जीवघेणे ठरले असून, सातपूर येथील निलय इंडस्ट्रीजजवळील हनुमान मंदिरासमोर झालेल्या भीषण अपघातात 42 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुजित राजेंद्र गायकवाड (रा. राहुलनगर, पवारवाडी, जेलरोड, नाशिक रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित गायकवाड हे मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता सातपूर येथील निलय कंपनी परिसरातून दुचाकीवरून जात होते. परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि चिखल असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
याचदरम्यान पुढे जाणाऱ्या चारचाकी वाहनचालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे सुजित यांच्या दुचाकीची चारचाकीला पाठीमागून धडक झाली आणि ते दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या छोटा हत्ती मालवाहू वाहनाच्या पुढील चाकाखाली ते आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. _ Nashik Pothole Accident Sujit Gaikwad
अपघातानंतर सुजित यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जेलरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे झालेला हा नववा बळी असल्याचे वृत्त समोर आले आहे. यापूर्वीही सातपूर-अंबड परिसरातील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतलेल्या दुर्घटना घडल्या आहेत. ऑगस्ट 2026 मध्येही सातपूर गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. _ Nashik Pothole Accident Sujit Gaikwad
सातपूर-अंबड औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि पावसाळ्यात निर्माण होणारा चिखल यामुळे वाहनचालक आणि कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, चिखल व खराब रस्त्यांची योग्य दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-Nashik Pothole Accident Sujit Gaikwad


Really impressed with the game variety on this site. It is refreshing to find a place that actually cares about the user experience. Go give braa45 a try!
[…] […]