Digital Arrest Scam Nashik July 2026मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याची बतावणी करून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नाशिकमधील सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची ५९.५८ लाखांची सायबर फसवणूक; सायबर पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

Digital Arrest Scam Nashik July 2026

नाशिक | MHDU प्रतिनिधी : दिपक सरोदे

नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल ५९ लाख ५८ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याची बतावणी करत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून एका खासगी कंपनीतील सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत तक्रारदाराला मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलिस विभागातील अधिकारी असल्याचे सांगत तक्रारदाराचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंध असल्याचा खोटा दावा केला. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक नाशिककडे रवाना झाल्याची भीतीही दाखविण्यात आली. (Digital Arrest Scam Nashik July 2026)

यानंतर सायबर भामट्यांनी तक्रारदाराला कोणाशीही संपर्क साधू नये, तसेच या प्रकरणाची माहिती कुणालाही देऊ नये, अशा सूचना दिल्या. त्यानंतर तब्बल ११ दिवस सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या काळात त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आरोपींकडून लक्ष ठेवण्यात आले.

तपास पूर्ण होईपर्यंत बँक खात्यातील रक्कम शासनाच्या खात्यात जमा करावी, अन्यथा कारवाई होईल, अशी खोटी माहिती देत आरोपींनी तक्रारदाराला विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यास भाग पाडले. अटकेची भीती आणि सामाजिक बदनामीच्या दबावाखाली तक्रारदाराने वेळोवेळी मोठी रक्कम संबंधित खात्यांमध्ये वर्ग केली.

खात्यातील सर्व बचत संपल्यानंतरही आरोपींकडून आणखी पैशांची मागणी सुरूच होती. त्यामुळे तक्रारदाराने आपल्या भाच्याकडे आर्थिक मदत मागितली. संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटल्याने भाच्याने चौकशी केली असता हा ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखालील सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत आरोपींनी तक्रारदाराच्या खात्यातील ५९ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम लंपास केली होती.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी? (Digital Arrest Scam Nashik July 2026)

या प्रकरणानंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सीबीआय, ईडी, कस्टम, पोलिस किंवा इतर कोणतीही तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करत नाही किंवा शासकीय खात्यात पैसे जमा करण्याचे निर्देश देत नाही. अशा प्रकारचा कॉल आल्यास घाबरून न जाता तात्काळ आपल्या कुटुंबीयांना माहिती द्यावी. संशयास्पद कॉल किंवा व्हिडिओ कॉल सुरू असल्यास इंटरनेट सेवा बंद करून त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Digital Arrest Scam Nashik July 2026

मुंजे मार्ग–संत कबीर नगर रस्ता सहा महिन्यांपासून दुरवस्थेत; विद्यार्थी, पालक व नागरिक त्रस्त

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Digital Arrest Scam Nashik July 2026 : Retired Chemical Engineer Duped of ₹59.58 Lakh in Nashik | ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची ५९.५८ लाखांची सायबर फसवणूक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed