Nashik Ambad MIDC Pothole Accident Death
नाशिक | ३० जुलै २०२६: अंबड एमआयडीसी परिसरातील एक्स्लो पॉइंट चौकातील धोकादायक खड्ड्यामुळे आणखी एका नागरिकाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कामटवाडे येथील व्यावसायिक नीलेश प्रल्हाद कोतकर (वय ४०, रा. आनंदनगर) यांचा अपघातानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८ जुलै) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास नीलेश कोतकर हे एक्स्लो पॉइंट परिसरातून डीजीपीनगर-२ मार्गे दुचाकीवरून आपल्या राहत्या घरी जेवणासाठी जात होते. त्यावेळी एक्स्लो पॉइंट चौकातील मोठा खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत असताना शेजारून भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळले. (Nashik Ambad MIDC Pothole Accident Death)
या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने वडाळा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
नीलेश कोतकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांकडून संबंधित यंत्रणेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी : कुणाल दानेच (Nashik Ambad MIDC Pothole Accident Death)


[…] […]
The bonus system on xlxwinplataforma is quite generous compared to other sites I’ve used. It really helps when you are just starting out. Definitely worth checking out. xlxwinplataforma