Lasalgaon Onion Express Halted Over Quality Disputeलासलगावमध्ये सडका आणि खराब कांदा दिल्लीला पाठवल्याचा आरोप करत प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी कांदा एक्सप्रेस रोखली.

Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute

नाशिक : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढून किरकोळ बाजारात कांदा ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून हा कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवला जात आहे.

याचाच एक भाग म्हणून लासलगाव रेल्वे स्थानकातून दिल्लीच्या आदर्श नगरकडे ‘कांदा एक्सप्रेस’द्वारे कांदा पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते. सुरुवातीला २१ बोगींमधून सुमारे ८४० मेट्रिक टन कांदा दिल्लीला पाठवण्याचे नियोजन होते. मात्र, पॅकिंग, लोडिंग आणि कांद्याच्या प्रतवारीच्या प्रश्नांमुळे या रेल्वे रॅकला मोठा विलंब झाला. अखेर प्रत्यक्षात सुमारे ४५० ते ५०० टन कांदा पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे._ Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute

दरम्यान, कांदा एक्सप्रेस रवाना होण्याच्या तयारीत असतानाच प्रहार किसान संघटनेचे गणेश निंबाळकर यांनी लासलगावच्या मालधक्क्यावर धाव घेत एक्सप्रेस रोखून धरली. रॅकमध्ये सडका, खराब आणि कमी दर्जाचा कांदा भरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रॅकमधील काही गोण्यांमध्ये १० ते २० मिमी आकाराचा कांदा आढळल्याचा दावा करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी हा कमी दर्जाचा कांदा असल्याचे सांगितले आहे._Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute

याचदरम्यान, नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा वखार महामंडळाच्या गोदामात सडल्याचेही वृत्त समोर आले आहे. काही कांद्याला उग्र वास येत असून काळा द्रव निघत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सडलेल्या कांद्यातून चांगला कांदा वेगळा करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत असून त्याचा थेट परिणाम कांदा एक्सप्रेसच्या लोडिंगवर झाला आहे.

गणेश निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत, सरकारी खरेदीसाठी चांगल्या प्रतीचा कांदा घेतला असल्याचा दावा केला जात असताना रॅकमध्ये कमी दर्जाचा आणि खराब कांदा कसा पोहोचला, असा सवाल उपस्थित केला. चांगल्या प्रतीचा कांदा नेमका कुठे आहे, याचा खुलासा अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, केंद्र सरकारच्या योजनेनुसार दिल्लीमध्ये बफर स्टॉकमधील कांदा नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडाराच्या माध्यमातून सुमारे ३५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. वाढत्या कांदा दरावर नियंत्रण आणणे आणि ग्राहकांना स्वस्त कांदा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे._ Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute

मात्र, ग्राहकांना स्वस्त कांदा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या ‘कांदा एक्सप्रेस’च्या लोडिंगमध्येच विलंब, कांद्याची गुणवत्ता आणि सरकारी खरेदीवरून प्रश्न उपस्थित झाल्याने लासलगावमध्ये या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. आता नाफेड आणि एनसीसीएफकडून या आरोपांवर काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

_ Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute

Nashik Rto School Van Drivers Morcha : नाशिक RTO कार्यालयावर स्कूल व्हॅन चालकांचा धडक मोर्चा; विविध मागण्यांसाठी आंदोलन

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute : लासलगावात ‘कांदा एक्सप्रेस’ रोखली; सडका कांदा पाठवल्याचा आरोप, NCCF अधिकाऱ्यांना धारेवर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed