Nashik Ring Road Farmers Meeting
नाशिक : नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ न देता मध्यम मार्ग काढून सर्वांना न्याय देण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.
गेल्या काही महिन्यांपासून रिंग रोडच्या प्रस्तावित अलाइनमेंट, भूसंपादनासाठी मिळणारा अपुरा मोबदला आणि सुपीक शेतीचे होणारे नुकसान या मुद्द्यांवर बाधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत अलाइनमेंट, भूसंपादन प्रक्रिया आणि योग्य मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, ज्या गावांनी अलाइनमेंटबाबत आक्षेप नोंदवले आहेत, त्या प्रत्येक गावातील प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. तसेच भूसंपादनाचा मोबदला निश्चित करताना संबंधित परिसरातील उच्चतम खरेदी-विक्री दराचा आधार घेतला जाईल. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी याच आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
बैठकीनंतर करण गायकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन आंदोलनामुळे शासनाला चर्चेची भूमिका घ्यावी लागली. आजची बैठक आशादायक ठरली असून अंतिम निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा एकजुटीने सुरू राहणार आहे. त्यांनी सर्व बाधित शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आवाहन केले.
Mahadut Janbindu : Vishal Bhadane Nashik Ring Road Farmers Meeting

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग शिर्डीकडे वळवण्यास सर्वपक्षीय नेत्यांचा ठाम विरोध
Nashik Ring Road Farmers Meeting
Nashik: A key meeting was held between Maharashtra Water Resources Minister Girish Mahajan and a delegation of farmers led by Chhava Krantiveer Sena President Karan Gaykar regarding issues faced by farmers affected by the Nashik Ring Road project.
Minister Mahajan assured that no injustice would be done to farmers and that the government would find a balanced solution to ensure justice for all stakeholders.
The meeting focused on concerns over the proposed alignment, inadequate land acquisition compensation, and the impact on fertile agricultural land. The minister stated that joint meetings with village representatives and senior officials would be conducted at the project sites to resolve alignment-related objections. He also assured that compensation would be determined based on the highest prevailing land transaction rates in the respective areas.
A high-level meeting at the state secretariat is expected later this week to take a final decision on the matter.
Karan Gaykar said the government’s willingness to hold discussions was a result of the farmers’ sustained agitation. While calling the meeting encouraging, he stated that the farmers’ united struggle would continue until a final decision is reached.


[…] नाशिक रिंग रोड प्रश्नावर शेतकऱ्यांना… […]