Pune–Nashik Semi High-Speed Railway Route Meeting
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्तावित मार्ग शिर्डीमार्गे वळविण्याच्या चर्चेला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत रेल्वेमार्ग पूर्वनियोजित सरळ मार्गानेच उभारण्याची ठाम मागणी करण्यात आली.
बैठकीत संगमनेर – अकोले – आळे फाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरूनगर – चाकण या मूळ मार्गावरच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे धावली पाहिजे, अशी एकमुखी भूमिका मांडण्यात आली. या मार्गामुळे प्रकल्पाचा मूळ उद्देश साध्य होईल आणि उत्तर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि उद्योग क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, नाशिक–शिर्डी तसेच अहिल्यानगर–पुणे रेल्वे प्रकल्पांना कोणताही विरोध नाही. उलट हे प्रकल्पही लवकरात लवकर पूर्ण व्हावेत, अशीच भूमिका आहे. मात्र, यासाठी पुणे-नाशिकचा पूर्वनियोजित सरळ रेल्वेमार्ग बदलून शिर्डीमार्गे वळवू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या बैठकीस माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, ॲड. माणिकराव कोकाटे, माजी खासदार शिवाजीराव पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, प्राजक्त तनपुरे, बाबाजीशेठ काळे, शरद सोनवणे, अमोल खताळ, अक्षय कर्डिले यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, या विषयावर पूर्वनियोजित मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रकल्प मूळ मार्गाने मंजूर होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला.
Mahadut Janbindu : Vishal Bhadane Pune–Nashik Semi High-Speed Railway Route Meeting

महापालिकेच्या महासभेत मोठा निर्णय; गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांवर 6 महिन्यांच्या निलंबनाचा इशारा
Pune–Nashik Semi High-Speed Railway Route Meeting
Leaders from across political parties have strongly opposed any proposal to divert the Pune–Nashik Semi High-Speed Railway via Shirdi. During a meeting chaired by Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil, representatives unanimously demanded that the project be implemented on its originally planned direct alignment.
The leaders insisted that the railway should follow the Sangamner – Akole – Ale Phata – Narayangaon – Manchar – Rajgurunagar – Chakan route, stating that this alignment best serves the project’s original objective and will benefit farmers, students, youth, industries, and residents of North Maharashtra and Pune district.
The meeting also clarified that there is no opposition to the proposed Nashik–Shirdi or Ahmednagar–Pune railway projects. However, participants strongly objected to altering the original Pune–Nashik route in favour of a Shirdi alignment.
A delegation of public representatives has decided to meet Chief Minister Devendra Fadnavis and continue pursuing the project until the original direct route is retained.


[…] पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग… […]