Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Roadचार महिन्यांपासून पगार थकीत असल्याचा आरोप; बिटको रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road

नाशिक रोड : वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (बिटको हॉस्पिटल), नाशिक रोड येथे सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याचा आरोप कामगारांनी केला असून, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

कामगारांच्या म्हणण्यानुसार, चार महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने घरभाडे, दैनंदिन खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. काही कामगारांवर तर भाड्याचे घर सोडण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी गमबूट, गणवेश, हॅण्ड ग्लोव्हज, मास्क यांसारख्या आवश्यक सुरक्षा साहित्याचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. तसेच वेतन कमी असून पीएफ आणि ईएसआयबाबतही योग्य प्रकारे लाभ मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कामगारांनी कंत्राटी पद्धतीच्या व्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शासकीय संस्थांकडून कंत्राट मिळवल्यानंतर कंत्राटदारांकडून कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. कामावर रुजू होण्यासाठी काही कामगारांकडून १५ ते २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात असल्याचाही दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

शासकीय ठिकाणाहून कंत्राटदारांना वेळेवर निधी मिळत असतानाही कामगारांचे वेतन तीन-चार महिने प्रलंबित ठेवले जाते, असा आरोप कामगारांनी केला आहे. पैसे मिळाले नाहीत, चेक आला नाही, बँक बंद आहे, अशा विविध कारणांनी कामगारांना टाळले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. _ Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road

दरम्यान, आज कंपनीचे सचिव आंदोलनस्थळी दाखल झाले असून त्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याची विनंती केली. मात्र, “गेल्या तीन-चार महिन्यांपासून पगार मिळत नसताना कामगारांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी संबंधितांकडे वेळ का नव्हता?”, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. _ Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road

कंत्राटी पद्धतीमुळे कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत ही व्यवस्था महाराष्ट्रातून हद्दपार करून कामगारांना कायमस्वरूपी आणि सुरक्षित रोजगारासह योग्य वेतन व मूलभूत सुविधा मिळाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

चार महिन्यांपासून वेतन थकीत असल्याच्या आरोपामुळे कामगारांच्या कुटुंबांवर निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन थकीत वेतन, पीएफ, ईएसआय आणि सुरक्षा सुविधांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road

Nashik Digital Arrest Cyber Fraud : मनी लाँडरिंगच्या नावाखाली 42 लाख 60 हजारांचा गंडा; ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून फसवणूक

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road : बिटको रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; चार महिन्यांपासून पगार थकीत असल्याचा आरोप”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed