Nashik Post Office Pension Adalat 2026
नाशिक | प्रतिनिधी : कुणाल दानेच
निवृत्त डाक कर्मचारी आणि कुटुंबीय पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारतीय डाक विभाग, नाशिक विभागात २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पेन्शन अदालत प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, जीपीओ आवार, नाशिक येथे होणार असून, इच्छुक निवृत्त कर्मचारी व कुटुंबीय पेन्शनधारकांनी २० जुलै २०२६ पर्यंत आपल्या तक्रारींचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक डाकघर विभागाच्या वरिष्ठ प्रवर अधीक्षकांनी केले आहे.
या अदालतीमध्ये निवृत्तीवेतन व कुटुंबीय पेन्शनशी संबंधित प्रलंबित तक्रारींची सुनावणी करण्यात येणार आहे. मात्र, पूर्णपणे न्यायप्रविष्ट (कायदेशीर) प्रकरणे, ई-वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढ, धोरणात्मक बाबी, शिस्तभंगाची प्रकरणे तसेच डीपीसीच्या पुनरावलोकनाशी संबंधित प्रकरणांचा या अदालतीत विचार केला जाणार नाही.
२० जुलैनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे डाक विभागाने स्पष्ट केले आहे.
पेन्शन अदालतीसाठीचा अर्जाचा नमुना संबंधित टपाल कार्यालयात उपलब्ध असून, अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर, नाशिक विभाग, जीपीओ आवार, नाशिक – ४२२००१ या पत्त्यावर सादर करावा.
Nashik Post Office Pension Adalat 2026
कॉलेज रोडवरील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; कुंटणखाना उद्ध्वस्त, तीन महिलांची सुटका


[…] डाक विभागाची २४ जुलैला पेन्शन अदालत; अ… […]