Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026पंचवटी येथील हिरे महाविद्यालयात "नशामुक्त युवा – विकसित भारत" जिल्हास्तरीय स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन.

Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026

पंचवटी, नाशिक | ३० जुलै २०२६ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथे ‘मेरा युवा भारत, नाशिक’ यांच्या वतीने आयोजित “नशामुक्त युवा – विकसित भारत” या जिल्हास्तरीय स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अखिल भारतीय मराठी नाट्य व चित्रपट महामंडळाचे कार्यवाह श्री. सुनील ढगे यांनी समाजप्रबोधनात कला, चित्रपटसृष्टी आणि प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “समाजप्रबोधनासाठी कला, चित्रपटसृष्टी आणि प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आजचा युवा आपल्या विचारांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी स्वतःहून पुढाकार घेणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.”

यावेळी त्यांनी हिरे महाविद्यालयाच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत, “लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या विचारांचा वारसा जपत महाविद्यालय अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे,” असे गौरवोद्गार काढले.

जिल्हा युवा अधिकारी श्री. अभिलाष म्हस्के यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि व्यसनमुक्त भारत घडविण्यात युवकांची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. (Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026)

संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे यांनी शासनाच्या “नशामुक्त युवा – विकसित भारत” अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांपर्यंत व्यसनमुक्त जीवनाचा संदेश पोहोचवण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाविद्यालय सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲड. शिवनाथ काटाड (पाटील) यांनी स्पर्धेची रूपरेषा आणि कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी व्यसनाधीनता ही समाजासमोरील गंभीर समस्या असल्याचे सांगितले. या विषयावर युवकांनी निर्भीडपणे विचार मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फिल्म आर्ट्स विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयात सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. “नशामुक्त युवा ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादनही त्यांनी केले. (Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026)

या स्पर्धेत गायन, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व, काव्यवाचन, शॉर्ट फिल्म आणि शॉर्ट रील्स अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश दिला.

यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. निकम, उपप्राचार्य डॉ. राकेश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमातील मान्यवरांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. चारुशीला नेरकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती देवरे यांनी केले, तर फिल्म आर्ट्स विभागाचे समन्वयक प्रथमेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून नशामुक्त व विकसित भारत घडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

प्रतिनिधी : प्रथमेश महाले Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026

एनसीएमसी कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026 : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन; कला व प्रसारमाध्यमांतून व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहन”
  1. [4847]365ph: Online Casino Philippines | Login, Register & App Download,Experience the thrill of 365ph, the premier online casino in the Philippines. Login or register today to enjoy a wide range of betting games, secure payouts, and a seamless mobile experience. Download the 365ph app now for non-stop gaming action! visit: 365ph

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed