Nashik Ajmeri Bakery Faces FDA Actionनाशिकच्या भारतनगर येथील अजमेरी बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १५१ किलो केक आणि कपकेक जप्त.

Nashik Ajmeri Bakery Faces FDA Action

नाशिकच्या वडाळा रोड परिसरातील भारतनगर येथील मे. अजमेरी बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाने धडक कारवाई केली. आवश्यक परवाना नसणे तसेच उत्पादन आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्याने विभागाने १५१ किलो केक आणि कपकेकचा साठा जप्त केला. याशिवाय संबंधित बेकरीला तातडीने व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

‘फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६’ अंतर्गत कारवाई _

अन्न व औषध प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६’ या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील आणि संकेत येलमामे यांच्या पथकाने बेकरीची तपासणी केली. _ Nashik Ajmeri Bakery Faces FDA Action

तपासणीदरम्यान बेकरीकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळले. तसेच अन्नपदार्थांचे उत्पादन आणि साठवणूक करण्यात येणाऱ्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.

४७ हजार ९९० रुपयांचा साठा जप्त

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत संभाव्य धोका लक्षात घेऊन अन्न सुरक्षा विभागाने संबंधित साठा जप्त केला.

या कारवाईत ३५ हजार ७५० रुपये किमतीचे १४३ किलो केक आणि १२ हजार २४० रुपये किमतीचे आठ किलो कपकेक जप्त करण्यात आले. या दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थांची एकूण किंमत ४७ हजार ९९० रुपये असून, एकूण १५१ किलो साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला अन्नपदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला. _ Nashik Ajmeri Bakery Faces FDA Action

ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी महत्त्वाची

सणासुदीच्या काळात मिठाई, केक आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते. अशा परिस्थितीत अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे महत्त्वाचे आहे. अन्न व्यवसायिकांनी आवश्यक परवाने घेऊन अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

प्रतिनिधी : कुणाल दानेच _ Nashik Ajmeri Bakery Faces FDA Action

Maharashtra Farmers Diwali Relief 2026 : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 जमा करणार; 40 नव्या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *