Nashik Educational Schemes Offline Application Deadline 2026नाशिकमधील पात्र विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजनांचे ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Nashik Educational Schemes Offline Application Deadline 2026

नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या मुदतवाढीमुळे अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

कोणत्या योजनांसाठी करता येणार अर्ज? _ Nashik Educational Schemes Offline Application Deadline 2026

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांसाठी पुढील योजना राबविण्यात येतात.

  • मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना

या योजनांद्वारे बारावीनंतर व्यावसायिक आणि अव्यावसायिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश आणि संबंधित लाभ मिळू शकतात.

पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठीही संधी _ Nashik Educational Schemes Offline Application Deadline 2026

अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील रिक्त जागांवर प्रवेश देण्याची तरतूद आहे. प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळू शकतो. इतर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेशाचीही तरतूद नमूद करण्यात आली आहे. प्रवेशासाठी संबंधित योजनेचे नियम, पात्रता आणि उपलब्ध जागांचे निकष लागू राहतील.

अर्ज कुठे जमा करायचा? _ Nashik Educational Schemes Offline Application Deadline 2026

पात्र विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत खालील कार्यालयात जमा करावी.

कार्यालयाचा पत्ता:

सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग,

सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ,

नाशिक-पुणे रोड, नाशिक – ४२२०११.

अर्जाची अंतिम मुदत: ३० ऑक्टोबर २०२६

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संतोष चव्हाण यांनी पात्र विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा आणि आवश्यक कागदपत्रे व पात्रतेच्या अटी संबंधित कार्यालयाकडून तपासून घ्याव्यात.

प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Nashik Educational Schemes Offline Application Deadline 2026

Nashik October Heat Temperature Update : नाशिकमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम; सलग सात दिवस पारा 35 अंशांपुढे

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *