Munje Marg Sant Kabir Nagar Road Nashik
नाशिक | प्रतिनिधी :
मुंजे मार्गावरील भोसला भवनपासून संत कबीर नगरकडे जाणारा रस्ता गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून अत्यंत दुरवस्थेत असून, या मार्गावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, पालक, नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर भोसला स्कूल असल्याने शेकडो विद्यार्थी दररोज याच रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालणे कठीण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावर भूमिगत पाईपलाईनचे काम झाल्यानंतर करण्यात आलेली दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाली. त्यामुळे पूर्वी रुंद असलेला रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला असून, रस्त्याची पातळीही असमान झाली आहे. परिणामी समोरासमोर दोन चारचाकी वाहने सहजपणे जाऊ शकत नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच-सखल भाग आणि मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज या मार्गावरून जाताना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पावसाळ्यात या रस्त्यावरील समस्या अधिक गंभीर बनते. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर वारंवार किरकोळ अपघात घडत असून, सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Munje Marg Sant Kabir Nagar Road Nashik)M
तसेच संत कबीर नगर परिसरातील रस्त्यावरील कामाची विल्हेवाटही योग्य प्रकारे लावण्यात आलेली नसल्याची स्थानिकांची नाराजी आहे. संबंधित यंत्रणांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करून निकृष्ट कामाची दखल घ्यावी आणि रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Munje Marg Sant Kabir Nagar Road Nashik
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये शर्मिला धनखड यांचे ऐतिहासिक सुवर्णपदक


[…] […]
Finally found an app that doesn’t lag! The slot selection is massive and the bonuses are actually fair. It’s my go-to for some quick fun during my break. Highly recommend okplayslotapk