Krishna Janmashtami Celebration at Chandwadचांदवडच्या श्री गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Krishna Janmashtami Celebration at Chandwad

चांदवड : पुण्यशील देवी अहिल्याबाई होळकर कालीन श्री गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट ते शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक श्री. एम. के. पवार व मंदिराचे पुजारी श्री. अमोल दीक्षित यांनी दिली.

शनिवार, दि. २९ ऑगस्ट ते मंगळवार, दि. १ सप्टेंबरपर्यंत श्री. प्रभंजन बुवा भगत (लोणी) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच बुधवार, दि. २ सप्टेंबर ते शनिवार, दि. ५ सप्टेंबरपर्यंत श्री. प्रसाद महाराज भागवत (पैठण) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे._ Krishna Janmashtami Celebration at Chandwad

शनिवार, दि. २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या उत्सवात श्रींचा महाभिषेक, शृंगार पूजा, दुपारी महिला भजनी मंडळाचे भजन, हरिपाठ, गीतापाठ, विष्णुसहस्रनाम तसेच रात्री ९ ते ११ या वेळेत नारदीय कीर्तन, आरती व प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी श्रींची महाआरती व महाप्रसाद, तर रात्री काल्याचे कीर्तन व प्रसादाने जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.

पुत्रप्राप्तीच्या मनोकामना पूर्तीसाठी ज्यांना गोपालकृष्ण ओटीत घ्यायचा आहे, त्यांनी मंदिरात संपर्क साधावा, असे आवाहन मंदिराचे पुजारी श्री. अमोल दीक्षित यांनी केले आहे.

या उत्सवाच्या यशस्वितेसाठी श्री. अरुण दीक्षित, किशोर दीक्षित, भूषण दीक्षित, चैतन्य दीक्षित, अर्चित दीक्षित तसेच दीक्षित परिवार विशेष परिश्रम घेत आहेत.

प्रतिनिधी : संजय जाधव _ Krishna Janmashtami Celebration at Chandwad

Ambad Link Road Accident Sunil Borse : अंबड लिंक रोडवर अपघाताचा आणखी एक बळी; सुनील बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Krishna Janmashtami Celebration at Chandwad : चांदवडच्या श्री गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात कृष्ण जन्मोत्सवाची जय्यत तयारी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed