Nashik Crime News Ambad Unit 3 Arrest
गुन्हे शाखा अंबड, युनिट-३ ची कामगिरी
खुनाचा प्रयत्न व दंगा या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा अंबड युनिटच्या ताब्यात
गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यांचा जलद व प्रभावी तपास करणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे याकरिता मा.पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक सो., नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा अंबड युनिट-३ ची स्थापना करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
दि. २५/०५/२०२६ रोजी दुपारी ३.१५ वा. सत्यम प्लाय व रामेश्वर प्लाय या दुकानासमोर संतोष सातदिवे व सतीश सातदिवे यांचेकडे गाड्या व दुकान चालवता म्हणून इसम नामे चेतन सुभाष गडवे, आशिष शरद जगताप व त्यांचे साथीदार यांनी पैशांची मागणी केली. परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्या गोष्टीचा आरोपींनी राग येवून त्यांनी संतोष सातदिवे व सतीश सातदिवे यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून डोक्यात फरशी, शिडी, फेकळीकोळचे डबे मारून गंभीर दुखापत केली होती. त्यावरून फिर्यादी नामे श्रीमती संगीता विलास वानखेडे, वय ४६ वर्षे, रा. आंबेडकर पुतळ्या जवळ, आंबेडकरवाडी, पुणे रोड, नाशिक यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २४८/२०२६, भा.न्या.सं. कलम १०९(१), १११, ३५२, ३५१ (२), १६८(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नमुद गुन्ह्यातील आरोपी सागर काशिनाथ पवार हा अवधूतवाडी येथे असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती पोहवा. ४९७ सोनवणे व पोअं. २५०९ निकम यांना प्राप्त झाली होती.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा अंबड युनिट-३ कडील अधिकारी व अंमलदार यांनी दि. १२/०८/२०२६ रोजी अवधूतवाडी, पंचवटी, नाशिक येथे सापळा लावून पाहिजे आरोपी नामे सागर काशिनाथ पवार, वय २९ वर्षे, रा. कस्तुरी किराणा दुकानाच्या बाजुला, पाण्याचे टाकीजवळ, गजानन चौक, अवधूतवाडी, पंचवटी, नाशिक यास ताब्यात घेतले. नमुद आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपुस केली असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाईकामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Nashik Crime News Ambad Unit 3 Arrest)
सदरची कामगिरी मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त सो., मा.श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, मा.श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त सो. गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट-३ चे वपोनि. जगवेंद्रसिंग राजपूत, पोउनि. मोतीलाल पाटील, पो.हवा. प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, चारूदत्त निकम, हर्षल जाधव, महेंद्र दौंदे, कुणाल पचलोरे, संजय बेनके, राजेश महाले, गौरव धात्रक व मपोअं. सविता कदम नेम. गुन्हे शाखा अंबड यांनी केली आहे.
Nashik Crime News Ambad Unit 3 Arrest


[…] […]
Such a fun gaming experience. I love how they keep updating the games. If you are looking for action, ph200jili is the way to go.
The most reliable login page I have used so far. No lag and the connection is stable even on mobile data. Cheers to jili65login for the great service.
Honestly, I’ve tried a few sites recently but this one is surprisingly smooth. The payouts are fair and the games load fast. Definitely my new favorite spot! Check it out at gbo303slot