Nashik Heat Resilient City Agreementनाशिकला उष्णता-सहनशील शहर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; NMC आणि NRDC India यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार.

Nashik Heat Resilient City Agreement

वाढत्या उष्णतेच्या ताणाला सामोरे जाण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या पुढाकाराने नाशिक महानगरपालिका आणि NRDC India यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

देशातील निवडक १२ उष्णता-सहनशील शहरांमध्ये नाशिकची निवड झाली आहे. या अंतर्गत प्रायोगिक प्रकल्पासाठी प्राप्त झालेल्या ₹५ कोटींच्या निधीचा प्रभावी आणि नियोजनबद्ध वापर करण्यासाठी IIM नागपूरच्या उत्कृष्टता केंद्राचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे.

या उपक्रमांतर्गत नाशिक शहरासाठी उष्णता नकाशे तयार करणे, शीत निवारे उपलब्ध करणे, सावली आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा निर्माण करणे, आरोग्य यंत्रणेची पूर्वसज्जता करणे, तसेच सिंहस्थ कुंभमेळा २०२७ लक्षात घेऊन उष्णता-सहनशील शहर नियोजनावर विशेष भर दिला जाणार आहे.

यावेळी आमदार देवयानीताई फरांदे, आयुक्त मनीषा खत्री, नगरसेवक सागर लामखेडे, गौरव गोवर्धने, कोमल मेहरोलिया, शरद फडोळ, शैलेश ढगे, नरेश पाटील, उपआयुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

जनबिंदू प्रतिनिधी : दिपक सरोदे _ Nashik Heat Resilient City Agreement

Demand for Transfer of Tehsildar Makrand Diwakar : नाशिक कुंभमेळा प्राधिकरणातील तहसीलदार मकरंद दिवाकर यांना हटवण्याची मागणी; भालचंद्र भुजबळ यांचे आयुक्तांना पत्र

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik Heat Resilient City Agreement : वाढत्या उष्णतेच्या ताणाला सामोरे जाण्यासाठी नाशिक महापालिका आणि NRDC India यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *