Citylink Employees Help Missing Girl Reunite With Familyसिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 11 वर्षीय जान्हवी कुटुंबीयांना सुखरूप मिळाली.

Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family

नाशिक |

त्र्यंबकेश्वर दर्शन आटोपून सिटीलिंक बसने पंचवटीकडे प्रवास करणाऱ्या कल्याण येथील कोकणे कुटुंबातील 11 वर्षीय मुलगी बसमध्येच राहिल्याची घटना सोमवारी (31 ऑगस्ट) घडली. सिटीलिंक चालक आणि वाहक यांच्या सतर्कतेमुळे मुलीला सुरक्षितपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

कल्याण येथील सागर कोकणे यांच्या कुटुंबाने त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर सिटीलिंकच्या मार्ग क्रमांक 245 वरील बस क्रमांक MH-15 GV-7696 ने पंचवटीच्या दिशेने प्रवास केला. पंचवटी कारंजा येथे कुटुंबातील सर्व सदस्य बसमधून उतरले; मात्र त्यांची 11 वर्षीय मुलगी जान्हवी सागर कोकणे बसमध्येच राहिली. _ Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family

काही वेळानंतर मुलगी सोबत नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र जान्हवीचा शोध लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सिटीलिंक कार्यालयाशी संपर्क साधत मुलीची माहिती दिली. त्यानंतर संबंधित बसवरील चालक श्री. लोहकरे आणि वाहक सौ. अर्चना आंधळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी जान्हवी बसमध्ये एकटीच असल्याचे आणि आई-वडील दिसत नसल्याने ती रडत असल्याचे समोर आले. _ Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family

चालक व वाहकांनी तत्काळ नाशिकरोड येथील कामगिरीवरील पर्यवेक्षक चंद्रकांत आव्हाड तसेच किरण सानप, वैभव चौधरी, अमित उगले, गणेश जाधव, अनिल भुसावरे आणि राजेंद्र वाणी यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीला सुरक्षितपणे कंट्रोल रूममध्ये आणण्यात आले आणि आई-वडील येईपर्यंत तिची काळजी घेण्यात आली.

काही वेळाने जान्हवीचे आई-वडील सिटीलिंकच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले. मुलीला सुखरूप पाहताच आईने तिला घट्ट मिठी मारली. आई आणि मुलीच्या या भावनिक भेटीने उपस्थित प्रवासी तसेच सिटीलिंक अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही मन हेलावून गेले.

दरम्यान, मुलगी उपाशी असल्याचे लक्षात येताच सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी तिला बिस्किटे आणून दिली. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि माणुसकीच्या भावनेतून केलेल्या मदतीमुळे कोकणे परिवाराने सिटीलिंक प्रशासन व संबंधित कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तातडीच्या समन्वयामुळे हरवलेली चिमुकली काही वेळातच आपल्या कुटुंबीयांना सुखरूप मिळाली.

प्रतिनिधी : सोपान रणपिसे _ Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family

Chandwad Cleaning Workers Salary Payment : चांदवड नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन खात्यावर जमा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family : सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली 11 वर्षीय मुलगी कुटुंबीयांना सुखरूप मिळाली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed