Godavari River Youth Death Nashikगोदापार्क परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.

Godavari River Youth Death Nashik

नाशिक : पेठरोड परिसरातील गोदापार्कजवळ गोदावरी नदीपात्रात बुडाल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२६ ऑगस्ट) दुपारी समोर आली. शुभम मारुती पवार असे मृत तरुणाचे नाव असून, तो समर्थ नगर, पेठ रोड परिसरात वास्तव्यास होता.

बुधवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास गोदापार्क येथील जॉगिंग ट्रॅकजवळ नदीपात्रात शुभम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचा आतेभाऊ निलेश नंदू गुंजाळ यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शुभमला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. _ Godavari River Youth Death Nashik

रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता शुभम यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर या घटनेची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

शुभम यांच्या आकस्मिक निधनाची बातमी परिसरात समजताच समर्थ नगर आणि पेठरोड भागात शोककळा पसरली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. एस. बाविस्कर करत आहेत.

Godavari River Youth Death Nashik

Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute : लासलगावात ‘कांदा एक्सप्रेस’ रोखली; सडका कांदा पाठवल्याचा आरोप, NCCF अधिकाऱ्यांना धारेवर

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Godavari River Youth Death Nashik : गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पेठरोड परिसरात हळहळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed